Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeमहसुल वार्ताकोरपना तालुक्यात गौण खनिज तस्करी बळावली; तहसीलदार आखरे विरुद्ध तीव्र संताप

कोरपना तालुक्यात गौण खनिज तस्करी बळावली; तहसीलदार आखरे विरुद्ध तीव्र संताप

गड़चांदुर ( संपादक विशेष रिपोर्ट )

कोरपना तालुक्यात अवैध रेत उत्खनन व इतर गौण खनिज तस्करीला खुलेआम खतपाणी घातले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक, ट्रॅक्टर चालक व मालक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे .

नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात गौण खनिज तस्करीसाठी सर्वात पोषक वातावरण कोरपना तालुक्यात तयार झाले असून, यामागे महसूल प्रशासनाची दुर्लक्षपूर्ण भूमिका कारणीभूत आहे. विशेषतः तहसील कार्यालयाकडून होत असलेली कथित डोळेझाक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोळसी- १ व २ मधून पोकलेन मशीन द्वारे दररोज राजरोस पने उत्खनन होत आहे , बिना टीपी रेत खुल्या बाजारत वीकली जात आहे त्यावर कोणताही महसुल अधिकारी लक्ष देत नाही . वरिष्ठ अधिकारी यांचा दबाव वाढला की ट्रैक्टर ट्रॉली वर कारवाही केल्या जाते . ह्याला न्याय कसा म्हणावा ..

नियम आमच्यासाठी, मोकळीक तस्करांसाठी?” — नागरिकांचा सवाल

स्थानिक ट्रॅक्टर चालक व मालकांचे म्हणणे आहे की, , लहान व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा तर मोठ्या तस्करांवर अभय असा दुजाभाव सातत्याने होत आहे.
यामुळे कायद्यावरचा विश्वास उडाला असून महसूल यंत्रणा कोणाच्या संरक्षणाखाली काम करतेय, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यालयात उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह

तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबतही शंका व्यक्त केली जात असून, प्रशासनिक नियंत्रणाचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. याचाच परिणाम म्हणून अवैध रेत वाहतूक, रात्रीच्या वेळी खुलेआम उत्खनन व बिनधास्त ट्रॅक्टर-हायवा वाहतूक सुरू असल्याचे नागरिक सांगतात.

मोर्चाचा इशारा, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या कथित गैरप्रकारांविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा ; जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीची मागणी
करण्यात येणार असल्याचे ट्रैक्टर ट्रॉली चालक मालक संघटनने स्पष्ट केले आहे. “प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल,” असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा -शास्ति व निर्मूलन १९७९ अनुरूप लोकसेवाक तहसीलदार पल्लवी आखरे यांची चौकशी करून उचित कारवाही करण्यात यावी या विषयी जिल्हा कांग्रेस कमेटीचे सदस्य ह्यांनी महसुल मंत्री व  जिल्हाधिकारी  यांना निवेदन दिले आहे .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular