Monday, October 26, 2026
Google search engine
Homeक्राइम नामानागपूर: कामठी रोडवरील काली माता मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी करणारा आरोपी जेरबंद;...

नागपूर: कामठी रोडवरील काली माता मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी करणारा आरोपी जेरबंद; नवीन कामठी पोलिसांची धडक कारवाई

नागपूर शहर प्रतिनिधि : ( नवनीत तिवारी )
नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील चोरीची एक महत्त्वाची घटना उघडकीस आली आहे. कामठी रोडवरील मोक्षधाम येथील काली माता मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट लांबवणाऱ्या चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटना नेमकी काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १४:०० ते १८:०० वाजेच्या दरम्यान कामठी रोडवरील मोक्षधाम काली माता मंदिराच्या आत अज्ञात इसमाने प्रवेश केला. चोरट्याने मंदिरातील देवीचा अंदाजे ५५ ते ६० ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २०,००० रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरून नेला होता. या प्रकरणी फिर्यादी सन्नी सिद्धार्थ चव्हाण (वय ३३ वर्ष, रा. कोळसाटाल मस्जिद जवळ, कामठी) यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ड), ३३१ (३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गोपनीय माहितीद्वारे आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास सुरू असताना नवीन कामठी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, सदर चोरी धनराज नारायणस्वामी पिल्ले (वय ३१ वर्ष, रा. सैलाब नगर झेंडा जवळ, पो. ठाणे नवीन कामठी) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट (अंदाजे वजन ५५ ते ६० ग्रॅम, किंमत अंदाजे २०,००० रुपये) जप्त केला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई उच्च पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक: श्री. महेश आंधळे
तपास अधिकारी व अंमलदार: पो.उप.नि. योगेश नाल्टे, सफौ किशोर महंत, पो.अं. विवेक दोरसेटवार, सुरज ठाकुर, आशिष बागडे आणि तुषार मोरे इत्यदि अधिकारी व कर्मचारी सहभागी होते . कामठी येथील नागरिकांनी पोलिसांनी तत्पर कारवाही केल्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular