Monday, October 26, 2026
Google search engine
HomeChandrapurसाई वर्धा पॉवर प्लांटकडून पर्यावरण नियमांची पायमल्ली; एमपीसीबी च्या ४५ अटी व...

साई वर्धा पॉवर प्लांटकडून पर्यावरण नियमांची पायमल्ली; एमपीसीबी च्या ४५ अटी व केंद्र सरकारच्या अधिसूचनांना हरताळ फासत पिंपळगाव सिंगारात बेकायदेशीर राख डम्पिंग !

५०-६० फूट खोल खड्ड्यांत थेट ‘बॉटम ऐश’ टाकल्याने जलस्रोत व भूगर्भ धोक्यात; नागरिकांचे आरोग्य ऐरणीवर

साई वर्धा व्यवस्थापनाचा दावा सर्व आवश्यक एनओसी चे अधीन राहून काम .. 

चंद्रपूर:
साई वर्धा पॉवर प्लांटकडून पर्यावरण नियमांचे खुलेआम उल्लंघन सुरू असून, पिंपळगाव सिंगारा परिसरातील विनापरवाना गिट्टी खदाणीत हजारो टन ‘बॉटम ऐश’ (पावर प्लांटची राख) सर्रासपणे टाकली जात असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF & CC) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ४५ हून अधिक कठोर अटी व मार्गदर्शक तत्त्वांना पायदळी तुडवत हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

साई वर्धा पॉवर प्लांटला परिचालन व राख व्यवस्थापनासाठी विविध कायदेशीर आणि पर्यावरणीय अटींचे कडक पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, पॉवर प्लांट व्यवस्थापन या नियमांची अंमलबजावणी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे:
२५/०१/२०१६ ची MoEF अधिसूचना
०९/०२/२०१८ च्या CPCB (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ) मार्गदर्शक सूचना (Guidelines)
३१/१२/२०२१ ची MoEF & CC अधिसूचना
व MPCB कडून लागू करण्यात आलेल्या ४५ अटी व शर्तींचे  पालन कंपनीने केली नसल्याची बाब उघड़किस आली आहे .

शास्त्रीय नियमांचे तिनतेरा;
५०-६० फूट खोल खड्ड्यांत थेट डम्पिंग

माती – ऐश , माती-ऐश असे थर रचले नाही !
शासकीय नियम व CPCB च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, खदाणी किंवा खड्डे बुजवण्यासाठी थेट राख न भरता माती आणि राख यांचे आलटून-पालटून थर (माती-ऐश-माती) देणे अनिवार्य असते. परंतु, पिंपळगाव सिंगारा परिसरातील (अक्षांश 20.4068°, रेखांश 78.9792°) चंदनखेडे यांच्या द्वारे उत्खनन केलेल्या ५० ते ६० फूट खोल गिट्टी खदाणीत कोणतीही पूर्वपरवानगी किंवा ‘नाहरकत प्रमाणपत्र’ (NOC) नसताना थेट लाखो टन राख ओतली जात आहे.
या बेकायदेशीर आणि अशास्त्रीय डम्पिंगमुळे राख हवेत उडून प्रचंड वायुप्रदूषण होत आहे. तसेच या खदाणीच्या परिसरात पाण्याचे मोठे नैसर्र्गिक साठे असल्याने विषारी राख भूगर्भातील पाण्यात मिसळून पिण्याचे पाणी व शेती दूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासन कारवाई करणार की पांघरून घालणार?

पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली एमपीसीबी आणि जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, साई वर्धा पॉवर प्लांटकडून मात्र खुलेआम निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. एमपीसीबी च्या कठोर अटींना धाब्यावर बसवणाऱ्या या पॉवर प्लांटवर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ कायदेशीर कारवाई करून कडक पावले उचलणार, की या बेजबाबदार कृत्यावर पांघरून घालणार? याकडे आता पिंपळगाव सिंगारा येथील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पर्यावरण संरक्षनार्थ तथागत बहुउद्देश्यीय ग्राम विकास संस्थेची एमपीसीबीला लक्ष्वेधी तक्रार व आवश्यक मागण्या ..

 पिंपळगाव सिंगारा येथील बेकायदेशीर राख डम्पिंग तात्काळ थांबवण्यात यावे. ; पर्यावरणीय अटी व सीपीसीबी च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साई वर्धा पॉवर प्लांटवर कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई व्हावी. ; दूषित झालेल्या परिसराची व भूगर्भातील पाण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीने पाहणी करण्यात यावी. अशी मागणी वजा तक्रार दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular