Tuesday, July 28, 2026
Google search engine
Homeमहसुल वार्ताचंद्रपूर भूमी अभिलेख कार्यालयात बनावट मोजणीचा घोळ: दिवाणी न्यायालयाचा अवमान करत लाखों...

चंद्रपूर भूमी अभिलेख कार्यालयात बनावट मोजणीचा घोळ: दिवाणी न्यायालयाचा अवमान करत लाखों चे वारेन्यारे !

दिवाणी दावा क्र. १७७/२०१६ मा. दिवाणी न्यायालय (४) चंद्रपूर यांचा भूमरेड्डी गिज्जेवार द्वारे अवमान ! गिज्जेवार विरुद्ध फ़ौझदारी कारवाही ची मागणी

चंद्रपूर: ( भाग २ ) 
भूमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर येथे भू-माफिया आणि दलालांशी संगनमत करून न्यायालयाचा थेट अवमान करत जमिनींची बेकायदेशीर व बनावट मोजणी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मा. दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दावा आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश धाब्यावर बसवून हा संपूर्ण घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदार *विजय ठाकरे* यांनी जमाबंदी आयुक्त आणि प्रधान सचिव (महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई) यांच्याकडे तक्रार नोंदवून दोषींवर BNS २०२३ व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तात्काळ एफआईआर नोंदवण्याची आणि निलंबनाची मागणी केली आहे.

तक्रारीतील मुख्य व गंभीर गैरप्रकार:
दिवाणी न्यायालयाचा उघड अवमान:
मौजा दाताळा (सर्व्हे क्र. २१४) येथील वादग्रस्त *११ गुंठे जागेबाबत दिवाणी दावा (क्र. १७७/२०१६)* न्यायालयात प्रलंबित आहे. २०२२ च्या कोर्ट आदेशानुसार दिलेल्या एक महिन्याच्या मुदतीत कमिशनर मोजणीची फी न भरल्याने ही मोजणी झालेली नव्हती. सदर बाब न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना आणि २३ जुलै रोजी पुढील तारीख असतानाही, अधिकाऱ्यांनी बे-कायदेशीरपणे हस्तक्षेप करत भू-माफियांच्या फायद्यासाठी बनावट मोजणी उरकून घेतली.

हद्द वाढवून मूळ सीमांकन दगड उपटले.
चतुरसीमेतील उत्तरेकडील प्लॉट क्र. ११ धारक विजय आणि दक्षिणेकडील सर्व्हे क्र. २१३ चे धारक नागरकर यांना *कोणतीही नोटीस न देता* ही मोजणी करण्यात आली. भू-माफियांचे हितसंबंध जपण्यासाठी तक्रारदार यांच्या *प्लॉट क्र. ११ चे मूळ सीमांकन दगड उपटून फेकून देण्यात आले* आणि वादग्रस्त जमिनीची बेकायदेशीर हद्दवाढ करण्यात आली. या मोठ्या गैरव्यवहारात जिल्हा अधीक्षक जगताप व उपअधीक्षक गिज्जेवार यांनी मुख्य भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

कामाची बेकायदेशीर अदलाबदल व सर्वेअरचा मनमानी कारभार:
शासकीय नियमानुसार छाननी लिपिक गुंडावार यांनी नोटिसा काढणे व प्रकरण तपासणे बंधनकारक असताना, हे मूळ काम सर्वेअर हितेश नथानी बेकायदेशीरपणे करत आहे. नथानी हा खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून चंद्रपुर तालुका सीमित वादग्रस्त मोजणीचा सूत्रधार असल्याचे दिसत असून कार्यलयीन शिस्तब्ध कर्मचारी यांच्यात कमालीची नाराजी असल्याची चित्र दिसत आहे.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांची भ्रष्ट साठगांठ:*
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा भूमी अधीक्षक *जगताप*, उपअधीक्षक *भूमरेड्डी गिज्जेवार*, कनिष्ठ लिपिक *दत्तात्रय राठोड*आणि सर्वेअर हितेश नथानी* यांनी पदाचा गैरवापर करून मोठी आर्थिक साठगांठ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कडक कारवाईची मागणी:
तक्रारदाराने या बनावट मोजणीची ‘क-प्रत’ तात्काळ रद्द करून सर्व संशयित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा शर्ति व निर्मूलन कायदा १९७९ च्या नियमांनुसार विभागीय चौकशी करून त्यांना सेवेतून तत्काळ बड़तर्फ करण्याची मागणी वरिष्ठ स्तरावर केली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular