बल्लारपुर ( मोह. सिराज )
राजुरा-बल्लारपूर मार्गावर मंगळवारी (१३ ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात आदर्श कैलास राठोड (२४, रा. बीबी रामनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने (MH-33/T-3952) दुचाकीला (MH-34/AT-834) धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
या घटनेमुळे सुरजागड लोह प्रकल्प आणि राजुरा-बल्लारपूर रेल्वे साइडिंगवरील भारी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी व्हावी., अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने केल्या जात आहे .. मार्गावरील जड वाहनांची गती आणि वाहतुकीचे योग्य नियंत्रण केले जावे., पूल, वळणे व धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक आणि सुरक्षा उपाय तातडीने लागू करावेत.
स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टळू शकतील.



