Tuesday, October 27, 2026
Google search engine
HomeGadchandurगडचांदुर नगर परिषदेचा गलथान कारभार: सुयोग नगरकडे जाणारा रस्ता आणि परिसर घाणीच्या...

गडचांदुर नगर परिषदेचा गलथान कारभार: सुयोग नगरकडे जाणारा रस्ता आणि परिसर घाणीच्या साम्राज्यात!

गडचांदुर (प्रतिनिधी):

सणासुदीच्या काळात नागरिकांना आनंदाने सण साजरे करावे लागतात, मात्र गडचांदुर नगर परिषदेच्या हद्दीतील सुयोग नगरकडे जाणारा एकमेव रस्ता सध्या अस्वच्छता, कचरा आणि भ्रष्टाचाराचे विदारक चित्र दर्शवत आहे. या रस्त्याची व परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दलित सुधार वस्तीच्या रस्त्याची अवघ्या १० दिवसांत दुर्दशा सुयोग नगर परिसरातील दलित सुधार वस्तीच्या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम काही काळापूर्वीच करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या १० दिवसांच्या आतच या नवीन रस्त्याला भेगा पडल्या. यावरून बांधकाम अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे. रस्त्याच्या नावाखाली शासकीय निधीची उघडउघड लूट करण्यात आली असून, निकृष्ट कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
दोन वर्षांपासून तक्रारी, तरीही अधिकारी बेशर्म!
या भ्रष्टाचाराविरोधात आणि रस्ता दुरावस्थेबाबत त्रस्त नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने नगर परिषदेकडे तक्रारी केल्या. परंतु, संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी आणि बांधकाम अभियंता आणि बांधकाम विभागीय छोटे बड़े बाबू यांनी या तक्रारींकडे नेहमीच डोळेझाक केली असून ते पूर्णपणे बेशर्म ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला जाग आलेली नाही.

लोकप्रतिनिधी हतबल, नागरिकांमध्ये तीव्र रोष
एका बाजूला नगर प्रशासनाचा हा मनमानी आणि भ्रष्ट कारभार सुरू असताना, दुसरीकडे नगर प्रशासन चालविणारे लोकप्रतिनिधीही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण उरले नसल्याने नागरिकांच्या मूलभूत समस्या जैसे थे आहेत.
सणासुदीच्या काळातही नागरिकांना या घाणीच्या आणि खराब रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गडचांदुर नगर परिषदेने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकारी व अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी संतप्त मागणी सुयोग नगर व बोरकर नगरमधील नागरिकांमधून होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular