Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeराजकीयगडचांदूरच्या जनतेचा निर्णय ठाम! नीलेश ताजने नवे नगराध्यक्ष – पक्ष विरोधात, पण...

गडचांदूरच्या जनतेचा निर्णय ठाम! नीलेश ताजने नवे नगराध्यक्ष – पक्ष विरोधात, पण जनतेच्या पाठिंब्यावर ‘लोकनेता’ विजयी

गडचांदूर | विशेष प्रतिनिधी

गडचांदूर शहराच्या राजकारणात जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे— पक्ष नव्हे, काम करणारा नेता महत्त्वाचा!
गडचांदूरच्या जनतेने आधीच ठरवले होते की नीलेश ताजनेच नवे नगराध्यक्ष होणार. भाजपकडून अपेक्षित असतानाही, स्वपक्षातील आमदार देवराव भोंगले यांच्या विरोधामुळे नीलेश ताजने यांचे तिकीट कापण्यात आले, मात्र जनतेच्या पाठिंब्यापुढे हा विरोध तोकडा ठरला.

पक्षाच्या निर्णयाला न जुमानता, जनतेने नीलेश ताजने यांना ‘लोकनेता’ म्हणून निवडून दिले. हा निकाल म्हणजे केवळ एका पदाचा विजय नाही, तर पक्षीय अंतर्गत राजकारणाविरोधात जनतेचा रोष आणि लोकशाहीचा ठाम कौल आहे.

दरम्यान, राजुरा विधानसभा क्षेत्रात वाढलेले अवैद्यधंदे – रेती व कोळसा चोरीने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अवैध रेती उत्खनन, कोळसा तस्करी, आणि त्यामागे असलेली राजकीय-संरक्षणाची चर्चा उघडपणे रंगू लागली आहे. तोहगांव परिसरात आमदाराचे मेहुने रेत तस्करित अडकल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला .
६० वर्षात असा लोकप्रतिनिधि राजुरा विधानसभा क्षेत्रात कुनीच बघितला नाही अशी भावना जनतेत उफालून दिसली या सगळ्या प्रकारांमुळे भाजपाविरोधात नागरिकांचा रोष वाढत असून, पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

op

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे—
“अवैध धंदे वाढत असताना सत्ताधारी गप्प का?”
याच प्रश्नाचं उत्तर मतपेटीतून देत, गडचांदूरच्या जनतेने नीलेश ताजने यांच्या बाजूने कौल दिला.

➡️ पक्षीय आदेशांपेक्षा जनतेचा निर्णय मोठा ठरला
➡️ नीलेश ताजने यांचा विजय म्हणजे भाजपासाठी इशाराच
➡️ राजुरा विधानसभा क्षेत्रात बदलाची चाहूल

गडचांदूरचा हा निकाल आगामी राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार, यात शंका नाही.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular