Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurपक्षाने निलंबित केले तरीही नीलेश ताजने यांची ‘पुन्हा उभारणी’; १००० भाजप सदस्य...

पक्षाने निलंबित केले तरीही नीलेश ताजने यांची ‘पुन्हा उभारणी’; १००० भाजप सदस्य करणारे कार्यकर्ते म्हणून बावनकुळे साहेबांनी दिलेल्या सन्मानपत्रामुळे वाढला जोश!”

गडचांदुर :
बंडखोर नेता म्हणून ओळखले जाणारे नीलेश ताजने यांना पक्षाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला—हे जरी सत्य असले, तरी ताजने यांच्या राजकीय प्रवासातील ही केवळ एक छोटीशी पायरी ठरत आहे. कारण वास्तव असे की, ताजने हे एक सामान्य कार्यकर्ते नाहीत, तर भाजपाचे तब्बल १००० सक्रिय सदस्य पक्षात दाखल करणारे आयोजक, संघटक आणि जनआंदोलन उभारणारे नेतृत्व आहेत.

ताजने यांच्या या कार्याची दखल घेत
माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्वतः
त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविले होते.
याच सन्मानाने ताजने यांच्या कामाला नवे बळ मिळाले आणि ताजने कार्यकर्त्यांत अधिक जोश, दृढता आणि उर्जा निर्माण झाली.

म्हणूनच निलंबनाची घोषणा जाहीर होताच ताजने समर्थकांमध्ये एकच आवाज घुमला—
“ही कारवाई राजकीय नाही, तर ताजने यांच्या वाढत्या ताकदीची भीती आहे!”

शहरात चर्चेचा सूर ठाम :
• “ज्याने १००० कार्यकर्ते पक्षात आणले, त्याच्यावरून पक्ष हात झटकतो?”
• “ताजने यांच्या सन्मानाला बावनकुळे साहेबांची मुहर—म्हणूनच जनतेचा विश्वास अजून मजबूत!”

आज परिस्थिती अशी की,
पक्ष निलंबन सांगत असताना देखील
स्वाभीमानी भाजपा , शेतकरी संघटना व गोंडवाना पक्ष नीलेश ताजने यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रदर्शन व प्रचार करित आहे .



स्वाभिमानी भाजपा  कार्यकर्त्यांची मत
“या निलंबनाने पक्षाने स्वतःच मोठी चूक केली… आता जनता ताजने यांच्या मागे भक्कम उभी झाली !” निलंबनाच्या घोषणेने ताजने अधिक लोकप्रिय झाले असून गडचांदुरात ताजने लाट उसळलेली आहे.
पक्षाच्या आदेशाचा जनतेवर कसलाच परिणाम नाही, उलट जनसमर्थन पूर्वीपेक्षा दहापट वाढताना दिसत आहे.. संदीप शेरकी । रामा मोरे

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular