Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeChandrapurचंद्रपूर प्रदूषण: 'महामाया कोल वॉशरी'ला आजच क्लोजर नोटीस जारी करा; पर्यावरण मंत्री...

चंद्रपूर प्रदूषण: ‘महामाया कोल वॉशरी’ला आजच क्लोजर नोटीस जारी करा; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारची मोठी कारवाई

सुनावणीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या ‘महामाया’ व्यवस्थापनाचे धाबे दणाणले

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना मंत्र्यांचा कडक इशारा

*मुंबई :*( चंद्रपुर )
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत असलेल्या आणि वारंवार तक्रारी करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या *’महामाया कोल वॉशरी’* विरोधात राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. महामाया कोल वॉशरीला *आजच ‘क्लोजर नोटीस’ (कामकाज बंद करण्याचे आदेश) जारी करण्याचे थेट निर्देश* राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभेत दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे महामाया वॉशरीच्या मनमानी कारभारावर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संशयास्पद भूमिकेवर उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांनंतर ही मोठी घोषणा करण्यात आली.

आमदार मुनगंटीवार यांचा विधानसभेत घणाघात

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रपूरच्या प्रदूषणाचा प्रश्न मांडताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महामाया कोल वॉशरीच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले:
“महामाया कोल वॉशरीमुळे परिसरातील शेती आणि नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. या वॉशरीतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, वारंवार तक्रारी करूनही संबंधित व्यवस्थापनावर कारवाई टाळली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.”

मुनगंटीवार यांनी प्रदूषण करणाऱ्या अशा मोठ्या उद्योगांकडून त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या किमान १ टक्का बँक गॅरंटी घेण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने ६८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची आक्रमक मागणी सभागृहात लावून धरली.

सुनावणीला दांडी; मंत्री पंकजा मुंडेंची कडक कारवाई
आमदार मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर दौऱ्यातील आपले प्रत्यक्ष अनुभव सांगत महामाया वॉशरीच्या उद्धट कारभारावर बोट ठेवले.
पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूर दौऱ्यादरम्यान कोळशाच्या धुळीने झाकलेली शेती आणि नागरिकांचे हाल त्यांनी स्वतः पाहिले आहेत. प्रदूषणप्रकरणी महामाया कोल वॉशरीला सुनावणीसाठी वारंवार बोलावण्यात आले होते, मात्र वॉशरीचे व्यवस्थापन सतत गैरहजर राहिले. या बेजबाबदारपणाची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी *”अशा कंपन्यांची मनमानी सहन केली जाणार नाही”** असे सांगत आजच्या आज महामाया कोल वॉशरीला ‘क्लोजर नोटीस’ बजावण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

महामायावर थेट कारवाई: सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महामाया कोल वॉशरी’चे कामकाज बंद होणार.

शेतकऱ्यांना न्याय:
वॉशरी आणि इतर प्रदूषणांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या निर्णयानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळणार.

बँक गॅरंटीचा नवा प्रस्ताव: मोठ्या उद्योगांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्या उलाढालीच्या १% बँक गॅरंटी घेण्याबाबत शासन सकारात्मक विचार करणार.

रोजगार आणि पर्यावरणाचा समतोल राखणार

“शासनाचा उद्देश उद्योग बंद पाडण्याचा नसून, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याचा आहे. रोजगार आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखले जाईल. मात्र, जे उद्योग वारंवार सांगूनही नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
महामाया कोल वॉशरीवरील या धडक कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणकारी इतर उद्योगांचेही धाबे दणाणले असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून घुग्गुस बेलसनी क्षेत्रातील जनतेला न्याय मिळऊन देण्याचा निश्चत केला असल्याचे दिसत असून त्यांचे कौतुक होत आहे .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular