Tuesday, June 2, 2026
Google search engine
Homeमहसुल वार्ताजीवाची पर्वा न करता तहसीलदार विजय पवार थेट नदीपात्रात; पिपरी घाटावर २...

जीवाची पर्वा न करता तहसीलदार विजय पवार थेट नदीपात्रात; पिपरी घाटावर २ हायवा ट्रक जप्त

जप्त वाहनांमध्ये MH 40 CQ 7459 आणि MH 34 AB 7955 चा समावेश; सत्ताधारी-विरोधकांचे ‘साटेलोटे’ उघड, महसूल पथकाची रात्रीची गस्त वाढली !

पिपरी ( चंद्रपुर ) बी.गौतम

अवैध रेती उत्खनन आणि तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात महसूल विभागाने मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. दिनांक २६ में च्या मध्यरात्री पिपरी (धानोरा) रेती घाटावर कर्तव्यदक्ष तहसीलदार विजय पवार यांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता थेट नदी पात्रात उतरून अवैध रेती उपसा करणारे २ हायवा ट्रक रंगेहात जप्त केले. या धडक कारवाईमुळे रेती माफिकांचे धाबे दणाणले असून, संपूर्ण परिसरात महसूल विभागाच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे कौतुक होत आहे.

जप्त केलेल्या वाहनांचे क्रमांक उघड
महसूल विभागाने अत्यंत गुप्तपणे आखलेल्या या मोहिमेत अवैध रेतीने भरलेले दोन मोठे हायवा ट्रक जागेवरच पकडले. यामध्ये **MH 40 CQ 7459** आणि **MH 34 AB 7955** या क्रमांकांच्या वाहनांचा समावेश असून, ही दोन्ही वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत.
नायब तहसीलदार धांडे यांनी दिलेल्या माहिती नुसार आशीष कछवा व राजू नांदेकर यांचे मालकीचे वाहन असल्याबाबत माहिती दिली . या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्या लॉबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय ‘साटेलोटे’ उघड; प्रशासनासमोर कसरत
या कारवाईदरम्यान एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एरवी एकमेकांचे कट्टर वैरी असणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व नेते अवैध रेती उपसा आणि चोरीसाठी एकत्र आल्याची चर्चा आहे. ‘आर्थिक’ फायद्यासाठी या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अभद्र युती केली आहे. या कारवाईनंतर प्रशासनावर दबाव आणण्यासाठी या तथाकथित ‘छूटभैये’ नेत्यांना सांभाळताना महसूल प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. मात्र, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पथकाने ही कारवाई तडीस नेली.

शिवनी – मारडा घाटावर ‘करडी नजर’
पिपरी येथील कारवाईनंतर आता महसूल विभागाने आपला मोर्चा शिवनी आणि मारडा घाटाकडे वळवला आहे. या घाटांवर सध्या प्रशासनाची करडी नजर असून, कोणतीही अवैध हालचाल खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज तस्करी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली असून, येत्या काळात याहूनही मोठ्या कारवायांचे संकेत आहेत.”
महसूल पथक

रात्रीची गस्त वाढली; मोठ्या कारवाईचे संकेत
तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे आणि त्यांच्या संपूर्ण महसूल टीमने आता रात्रीची गस्त प्रचंड वाढवली आहे. दिवस ढळल्यानंतर नदीपात्रातून होणारी रेतीची चोरी रोखण्यासाठी हे पथक स्वतः मैदानात उतरले आहे. आगामी दिवसांत रेती माफियांवर आणखी मोठे सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

महसूल मित्रांची’ साथ; विजय पवारांचे कौतुक*

विजय पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पिपरी, मारडा आणि शिवनी क्षेत्रात माफियांच्या नाकात वेसण घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे. अवैध रेती उपसा आणि गौण खनिज तस्करी पूर्णपणे रोखण्यासाठी आता स्थानिक तरुणही पुढे आले असून, अनेक तरुणांनी **’माझे महसूल मित्र’** म्हणून प्रशासनाला पाठिंबा दिला आहे. तरुणांच्या या सक्रिय सहभागामुळे महसूल विभागाचे बळ अधिकच वाढले आहे. राज्य शासनाचे जीआर प्रमाणे वाहन मालका विरुद्ध पोलीस तक्रार व्हावी अशी अपेक्षा तहसीलदार विजय पवार यांचे कडून व्हावी अशी परिसरात चर्चा आहे .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular