मार्च – एप्रिल व में १० पर्यंत तहसीलदार कोरपना यांच्या कारवाहया नाममात्र
महसुल सोबतच पोलीस कारवाही अनिवार्य – माननीय महसुल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुले साहेबांच्या महसुल व वन मंत्रालय द्वारे पारित सरकारी अध्यदेशाला केराची टोपली
गोंड़पिपरी-राजुरा उपविभागा मध्ये दररोज रेती धोरण २०२५ चे उल्लंघन

चंद्रपूर/कोरपना: ( गौतम भसारकर )
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीचा मुद्दा कमालीचा तापला असून, महसूल प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा नदीपात्रातून पोकलेन मशिनच्या सहाय्याने थेट नदीपात्रात उतरून नियमबाह्य उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून भूजल पातळी धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. या गंभीर प्रकारावर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर खाणीकर्म विभाग आणि स्थानिक महसूल प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया
गेल्या दोन दिवसांत महसूल विभागाने कोरपना तालुक्यात दोन वेगवेगळ्या धडक कारवाया केल्या. पहिली कारवाई राजुरा येथील ‘ताज ट्रेडर्स’ (प्रो.अमजत खान) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे . रेतीने भरलेल्या हायवा ट्रक अंबुजा फॅक्टरी कड़े जाताना ही कारवाही करण्यात आली. या वाहनाच्या कागदपत्रांची सध्या चौकशी सुरू आहे.
त्यानंतर आज, १७ मे रोजी गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले शाळेजवळ महसूल विभागाचे तलाठी रामटेके यांच्या पथकाने दुसरी मोठी कारवाई केली. या कारवाईत जिवती तालुक्यातील प्रसिद्ध वाळू व्यवसायी फिरोज शेख यांचे मालकीचे वाहन क्रमांक MH34BZ9839 पकडण्यात आले. फिरोज शेख हे सरताज कंस्ट्रक्शन शेनगांव तालुका जिवती चे प्रोपराइटर असल्याचे कळते.
महिन्याभरात तब्बल २० लाखांचा दंड; तरीही फिरोज शेख नेटवर्कचे गौण खनिज तस्करी कायम
वाळू व्यवसायी फिरोज हा चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज विरुद्ध केवळ एका महिन्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा आणि कोरपना येथे विनापरवाना रेती तस्करीच्या मोठ्या कारवाया झाल्या आहेत.
पोंभूर्णा (जूनगाव): पोकलेन मशीन जप्त करत ७ लाख ५० हजारांचा दंड.
**गोंडपिपरी:** ३ हायवा ट्रक जप्त करत ७ लाख ५० हजारांचा दंड.
**राजुरा:** हायवा ट्रक जप्त करत २ लाख ५० हजारांचा दंड.
*कोरपना (गडचांदूर):** आज झालेली कारवाई.
एकाच महिन्यात तब्बल २० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणे, यावरूनच अवैद्य रेती साम्राज्याची पाळेमुळे किती घट्ट रोवली गेली आहेत, याचा अंदाज येतो.
प्रशासकीय अभद्र युती? पोलिसांत गुन्हा का नाही?
एवढा मोठा गुन्हेगारी स्वरूपाचा रेतीचा काळाबाजार सुरू असतानाही, राज्य शासनाच्या स्पष्ट ‘जीआर’ (GR) नुसार पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा किंवा कोरपना पोलीस ठाण्यात फिरोज विरुद्ध अद्याप फौजदारी गुन्हा का नोंदवण्यात आला नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
“राज्य सरकारच्या महसूल मंत्र्यांनी तयार केलेले ‘रेत धोरण’ चंद्रपूर जिल्ह्यात लागू नाही का? की येथील महसूल आणि पोलीस प्रशासन शासन आदेशाला केराची टोपली दाखवत आहे? आर्थिक देवाणघेवाणीसाठी शासन नियमांचा बळी दिला जात आहे का?” असे अनेक गंभीर प्रश्न आता जनतेमधून विचारले जात आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आज (१७ में) कारवाई दरम्यान कोरपना महसुल प्रशासनाच्या भरारी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी बिना टीपी रेती परिवहन करताना ३ हायवा ट्रक पकडण्यात आले होते, मात्र त्यातील २ ट्रक सोडून केवळ एका हाइवा ट्रकवरच कारवाई करण्यात आली. यामुळे तलाठी रामटेके व अहिरकर यांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी झालेली कारवाईवर संशयाची सुई निर्माण झाली आहे. वाळू माफियांसोबत मोठी ‘आर्थिक देवाणघेवाण’ करून ते दोन ट्रक सोडण्यात आले का ? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
नदीपात्रांचे अस्तित्त्व संपवणाऱ्या या वाळू माफियांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी आणि सर्व तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



