Tuesday, June 2, 2026
Google search engine
Homeमहसुल वार्ताधक्कादायक: पोलीस दलातील 'स्वप्निल' नावाच्या लोकसेवकाचे रेती तस्करीचे रॅकेट ?

धक्कादायक: पोलीस दलातील ‘स्वप्निल’ नावाच्या लोकसेवकाचे रेती तस्करीचे रॅकेट ?

गडचांदूरमध्ये ट्रक पकडल्यानंतर फुटले पितळ; महसूल आणि पोलीस प्रशासनात खळबळ

चंद्रपूर/गडचांदूर: ब्युरो रिपोर्ट, गडचांदूर.

जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि गौण खनिज तस्करीने कळस गाठला असून, आता या काळ्या धंद्यात चक्क पोलीस दलातील ‘लोकसेवक’ गुंतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील घाटावरून विना ‘टीपी’ (Transporation Permit) रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH-34-CQ-2665 खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने गडचांदूर येथे आज पहाटे 3:35 वाजता पकडला. या कारवाईमुळे रॅकेटचे धागेदोरे पोलीस दलापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी कारवाई काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आज (१४/५) पहाटेच्या सुमारास खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून अवैध रेती वाहून नेणारा ट्रक पकडला. हा ट्रक गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला होता. आज सकाळी गडचांदूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर वाहन कोरपना तहसील कार्यालयात हस्तांतरित करण्यात आले आहे.

कोण आहे तो ‘स्वप्निल’ जो आहे पडद्यामागचा खरा सूत्रधार?

परिवहन विभागाच्या नोंदीनुसार या वाहनाचा मालक गणेश सुरनार (पाटण) असल्याचे समजते. मात्र, रेत तस्करी मध्ये गुंतलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायामागे पोलीस दलातील ‘स्वप्निल’ नावाचा एक लोकसेवक सक्रिय असल्याची बाब समोरा आली आहे . दिवसा पोलीस मुख्यालय व रात्रो रेती घाटावर असा नित्यक्रम या लोकसेवकाचा असल्याची माहिती रेत व्यवसायीकांनि श्रमिक मंथन ला खासगीत दिली .

ओळख लपवण्यासाठी शक्कल:

स्वतःची ओळख लपवण्यासाठी हा लोकसेवक इतरांच्या नावावर वाहने खरेदी करून रेतीची तस्करी करत असल्याची चर्चा आहे.

जुना इतिहास:
हा लोकसेवक पूर्वी कोरपना पोलीस स्टेशनला कार्यरत असताना ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी करण्यात त्याचा सहभाग होता. तिथे त्याचे ‘पितळ’ उघडे पडल्यानंतर त्याची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.
*प्रशासनाला चकवा:* दररोज सुरनार यांच्या मालकीचे ४ हायवा ट्रक गोंडपिपरी-कोठारी-बल्लारपूर-राजुरा आणि गडचांदूर पोलिसांना चकमा देऊन रेतीची चोरी करत असल्याचे बोलले जाते.

एंट्री’साठी ट्रॅफिक पोलिसांना फोन?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई टाळण्यासाठी सदर लोकसेवकाने रात्री गडचांदूर ट्रॅफिक पोलिसांना फोन करून “एंट्री देतो, मॅनेज करा” अशी विनंती केल्याचे समजते. जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली आणि ‘स्वप्निल’ नावाच्या या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे सीडीआर (Call Detail Record)तपासले, तर अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो.

प्रशासनासमोर मोठे आव्हान
एकीकडे महसूल विभाग अवैध गौण खनिज रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे रक्षकच भक्षक बनत असल्याचे हे चित्र प्रशासनासाठी भूषणावह नाही. आता जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या ‘खाकीतिल’ तस्करावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular