गड़चांदुर ( 23 जनवरी ; गौतम भसारकर )
अल्ट्राटेक सिमेंट ( यूनिट मनिकगढ़ ) कंपनीमुळे परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येच्या निषेधार्थ सिंडिकेट युवा मंचने पुकारलेले धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. कंपनी प्रशासनाने ही समस्या १५ दिवसांच्या आत कायमस्वरूपी सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
प्रशासकीय मध्यस्थी आणि बैठक
आज माननीय ठाणेदार श्री. शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि सिंडिकेट युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी सिंडिकेट युवा मंचचे रोहित सिंगाडे, रोहन काकडे, गणेश सातपडे, रुपेश चुधारी दीपक वरभे यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
काय मिळाले आश्वासन?
बैठकीत कंपनी प्रशासनाने लेखी स्वरूपात खालील बाबी मान्य केल्या आहेत:
नागरिकांना यापुढे दुर्गंधीचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पुढील १५ दिवसांच्या आत या समस्येवर तांत्रिक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. असे लेखी आश्वासन देण्यात आले
पुन्हा आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीचा आणि लेखी आश्वासनाचा मान राखून सिंडिकेट युवा मंचने २७ तारखेचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, दिलेल्या १५ दिवसांच्या कालावधीत जर आश्वासनाची पूर्तता झाली नाही किंवा दुर्गंधी कायम राहिली, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘सिंडिकेट युवा मंच’ पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.



