Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeWorker newsविजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे सदस्य रमेश केवट यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न...

विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे सदस्य रमेश केवट यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न !

गडचांदुर : ( गौतम भसारकर )

अंबुजा सिमेंट प्रकल्पात कंत्राटी कामगार म्हणून तब्बल २५ वर्षे अखंड आणि निष्ठेने सेवा बजावणारे रमेश केवट आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ सेवेला मानाचा मुजरा म्हणून जेष्ठ नागरिक सभागृह, गडचांदुर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय क्रांती लेबर यूनियन चे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे उपस्थित होते. मंचावर बबन आत्राम (महासचिव, विजय क्रांती लेबर यूनियन), तसेच सुधीर विद्यते, संजय इटनकर, किशोर मोहूर्ले, नीतेश गोहोकर, रवि शेंडे, किशोर गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन शंकर चेंनुरवार यांनी केले तर प्रास्ताविक गेमा काम्बले यांनी सादर केले.
सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवनीश लॉजिस्टिकमार्फत अंबुजा सिमेंट येथे कार्यरत असलेल्या रमेश केवट यांच्या शिस्तबद्ध कामगिरी, कष्टाळूपणाचे उपस्थितांनी कौतुक केले. संघटनेतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की, “रमेश केवट यांनी कठीण परिस्थितीतही प्रामाणिक सेवा देत कामगार बांधवांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.”

उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular