राजुरा ( प्रवीण चिड़े तालुका प्रतिनिधि
अवैध रेती उत्खननावर चाललेल्या विशेष मोहिमेत जप्त वाहनांच्या चौकशीत स्थानिक आमदारांच्या साळ्याचे नाव पुढे आल्याची प्राथमिक माहिती समोर येताच राजुरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या रात्री गोंड़पिपरीचे तहसिलदार शुभम बहेकर यांचे द्वारे निर्मित रात्रपाळी गस्ती पथकाने नायब तहसीलदार वेट्टी यांच्या सोबत तोहगाव परिसरात दोन ट्रेक्टर अवैद्य रित्या रेतीची वाहतूक करताना पकड़ले . वाहन तोहगाव निवासी मोरे यांचे मालकीचे असल्याचे चौकशी त नमूद निष्पन्न झाले आणि तेव्हाच रेती माफियांच्या साखळीत सत्ताधारी नातेसंबंधाचा धागा जोडला गेल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत.
जप्त वाहनांचे कागदपत्रे, मालकांची माहिती आणि व्यवहार तपासताना चौकशीदरम्यान तोहगाव तालुका गोंड़पिपरी या ठिकाणचे दोन्ही ट्रैक्टर गेल्या सहा – सात महिन्यापासून रेती व गौण खनिज तस्करित सम्मिलित होते हा उल्लेख वारंवार समोर आल्याचे सांगितले जात आहे. दोषसिद्धी नसली तरी नावाच्या ‘वजनामुळे’ राजकारणात तापमान तुफान वाढले आहे.
विरोधकांचे थेट निशाण्यावर प्रशासन
“जप्त वाहनांच्या मालकांची नावे जाहीर करण्यास तहसीलदारांची टाळाटाळ का? राजकीय दबाव आहे का?” असा सवाल विरोधकांनी करत तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर नागरिकांचा संताप—
“सामान्य नागरिकांचे नाव आले की तात्काळ कारवाई, पण सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांचे नाव आले की तपास मंद का?”
तपासयंत्रणांकडून वाहनांची मालकी, चालकांचे जबाब, कॉल डिटेल, उत्खनन स्थळे आणि आर्थिक व्यवहार यांची स्वतंत्र चौकशी सुरू असून, “उल्लेख आला म्हणजे गुन्हा मान्य होत नाही; पण तपास निपक्षपाती हवा,” असा प्रशासनाचा दावा.
परंतु राजुरात सध्या एकच चर्चा— आमदाराने किमान आपल्या नाते संबंधित लोकांना अवैद्य धंद्यापासुन दूर ठेवत समाजात नाव लौकिक कार्यात गुंतवने अपेक्षित होते परंतु तसे होताना दिसत नाही . दरम्यान साठ वर्षात पहिला असा आमदार जनता बघत आहे की जो आर्थिक लाभ प्राप्तिसाठी गौण खनिज तस्करित भागीदारी नोंद घेत आहे . ह्यमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात गल्लों गल्लीत आमदार महोदयाचे अवैद्य धंदे व त्यापासुन आर्थिक मोहमाया मिळने ह्या विषयी चर्चा सुरु आहे ..
“तपास किती वरपर्यंत पोहोचणार?”
कारण रेती तस्करी ही फक्त बेकायदा उत्खननाची बाब नाही; त्यामागे असलेल्या राजकीय संरक्षणछत्री, भ्रष्ट व्यवहार आणि स्थानिक पातळीवरील दबावगट यामुळेच हे प्रकरण अधिकच संवेदनशील झाले आहे.
आता जिल्ह्याचे लक्ष तपासयंत्रणांकडे. नावे मोठी असली तरी
कायद्यापुढे सर्व समान—हे सिद्ध करणे प्रशासनाची खरी परीक्षा अशी स्थिति राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनता अपेक्षा बाळगत आहे हे विशेष …



