वाहन चालक मालक कृपया ध्यान दे , मोटर बाइक गाड़ी संख्या MH34-AG-1203 -₹5500
MH34-N3603 , ₹ 5500
MH33H3790 ₹ 5000 अड़पल्ली जिल्हा गढ़चिरौली
MH34BJ0230 ₹ 2000
आप मान्यवरों के वाहन चालान ( दंडित ) हो चुके हैं । क्या चालान जारीकर्ता को जानते हैं ?
( भाग ३ )
चंद्रपूर/कोंडा फाटा:
महामार्ग पोलीस (हायवे ट्रॅफिक पुलिस) हे रस्त्यावरील सुरक्षेसाठी असतात, की केवळ ‘वसूली’साठी? असा संतप्त सवाल सध्या चंद्रपूर जिल्ह्यात विचारला जात आहे. कोंडा फाटा येथील महामार्ग पोलिसांकडून भ्रष्टाचार आणि अवैध वसुलीचा एक धक्कादायक प्रकार समोर येत असून, यामध्ये प्रामुख्याने
शेतकरी, शेतमजूर आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या कामगार वर्गाला*लक्ष्य केले जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
वसुलीचे ‘नेटवर्क’ आणि नागपूर कनेक्शन
प्राप्त माहितीनुसार, महामार्ग पोलिसांना वरिष्ठांकडून ठराविक ‘टार्गेट’ दिले जाते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस रस्त्यावरून जाणाऱ्या साध्या-भोळ्या मजुरांच्या दुचाकी अडवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दंडाची आकारणी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या वसुलीतील मोठा हिस्सा खालच्या स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी स्वतःकडे ठेवतात, तर उरलेली ‘काळी कमाई’ नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयापर्यंत आणि तिथून पुढे पोहोचवली जाते, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
वरिष्ठांचे अभय आणि तक्रारींकडे दुर्लक्ष
भ्रष्टाचाराची ही साखळी इतकी घट्ट आहे की, सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार केल्यास वरिष्ठ अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. “जो अधिकारी वसुली करून देतो, त्यालाच वरिष्ठ पाठीशी घालतात,” असा आरोप पीडित नागरिकांकडून केला जात आहे. वरिष्ठांना हप्ता हवा असतो, म्हणून खालचे कर्मचारी आणि कॉन्स्टेबल सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून अवैध वसुली करत आहेत.
शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असताना, आता खाकी वर्दीतील या ‘वसुली बहादरांनी’ त्यांची लूट सुरू केल्यामुळे जनसामान्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



