राजुरा/चंद्रपूर:
लोकशाहीत ज्या अधिकाऱ्यांनी जनतेचे अश्रू पुसायचे, तेच अधिकारी जेव्हा उद्योजकांच्या ‘चहा-पाण्यावर’ डोलतात, तेव्हा कुसुंबीच्या शेतकऱ्यांसारखा भीषण प्रसंग ओढवतो. गेल्या १८ महिन्यांपासून आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवणाऱ्या **राजुराचे उपविभागीय अधिकारी (SDO) रवींद्र माने** यांच्या विरोधात आता जनक्षोभ उसळला आहे. “माने यांच्या तोंडाला काळं फासा,” असे संतप्त आवाहन पीडित आदिवासींनी केले असून, या सर्व प्रकरणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
१८ महिने ‘व्हीआयपी’ पाहुणचारात, पण आंदोलकांकडे पाठ !
कुसुंबी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर माणिकगड सिमेंट कंपनीने ४० वर्षांपासून बेकायदेशीर ताबा मिळवून चुनखडीचे उत्खनन सुरू केले आहे.
विशेष म्हणजे आंदोलन स्थळापासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या कंपनीच्या ‘व्हीआयपी रेस्ट हाऊस’मध्ये एसडीओ रवींद्र माने यांनी १८ महिने ठिय्या मांडला होता. ज्या कंपनीच्या विरोधात आदिवासी आक्रोश करत होते, त्याच कंपनीच्या पाहुणचारात दंग असलेल्या या अधिकाऱ्याने एकदाही आंदोलन स्थळाला भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही.
अनेकदा जमीन परत देण्याचे आदेश होऊनही, माने यांनी ‘आज देतो, उद्या देतो’ म्हणत केवळ कंपनीची दलाली केली आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलले.
जनसत्यग्रह समितीची एसीबी चौकशीची मागणी
या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या साखळीवर ‘जनसत्याग्रह समिती’चे अध्यक्ष **आबिद अली** यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. “रवींद्र माने यांनी महसूल प्रकरणांत मोठी हेराफेरी केली असून, कुसुम्बी माइंस प्रकरण सुरु असताना राजुरा तालुक्यातील सस्ती-धोपटाला , गौरी – पवनी , कोलगाव साख़री क्षेत्रात WCL मध्ये जाणाऱ्या शेतजमिनींच्या ‘आराजी’मध्ये फेरफार करण्यासाठी दलालांमार्फत लाखोंची लूट केली आहे,” असा खळबळजनक आरोप आबिद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची विशेष समितीमार्फत आणि सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विषप्राशन आणि प्रशासनाचा थरकाप
गेल्या दोन वर्षांपासून मुख्यालयी न राहता कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी राहणाऱ्या या ‘दलाल’ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आज कुसुंबीच्या शेतकऱ्यांनी विष प्राशन केले. “आमच्या मृत्यूला रवींद्र माने जबाबदार आहेत,” अशी चिठ्ठी लछु आत्राम , जयराम कुलमेथे, पगु पेंडोर , बालाजी सिदम व मारोती तलांडे या शेतकऱ्यांनी लिहून आपला जिव संपन्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, जनतेचा संताप अनावर झाला आहे.
सामान्य जनतेच्या करामधून पगार घेणारे अधिकारी जेव्हा उद्योजकांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहून दलाली करतात, तेव्हा अशा अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का ?
उपजिल्हाधिकारी दर्जा – सरकारी बंगला- गाड़ी ( ड्राइवर ) दिमतिला 1 तहसीलदार 3 नायब तहसीलदार , सर्व सोप्सकर पार पाडन्यासाठी ( कौन किती दिले , बाकी किती ) अन्सारी बाबू – तरीही नागरिकांच्या सेवेत हयगय ह्यांना निलंबित करून चौकशी करने गरजेचे … विजय ठाकरे



