मुंबई : ( विजय ठाकरे ) महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र इंटक चे अध्यक्ष डॉ. कैलाश कदम यांनी भूषविले. यावेळी इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. चंद्रप्रकाश सिंग आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. सत्यजित रड्डी हे प्रमुखपाहुणे म्हणून व निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यकारिणीतील पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी व विविध युनिटचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत संघटनेच्या धोरणात्मक कामकाजावर, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तसेच औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कामगार हिताच्या दृष्टीने सक्रिय भूमिका घेण्याविषयी सर्व सदस्यांनी एकमत दर्शविले.
बैठकीदरम्यान महाराष्ट्र व केंद्रीय इंटक ची संलग्नता थकबाकी वर्गणी हा विषय विशेष चर्चेचा ठरला. सदर संघटनेची कार्यपद्धती व संघटनात्मक बांधिलकी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात दोन मुद्द्यांवर चर्चेचा केंद्रबिंदू राहिला—
थकबाकीदार संघटनांची संलग्नता रद्द करण्याचा पर्याय किंवा ठराविक अटींच्या अधीन राहून त्यांना संधी देण्याचा पर्याय या विषयावर सर्व जिल्ह्यांतील अहवाल मागवून पुढील कार्यकारिणी बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.
यावेळी कामगार सुरक्षा, वेतन करार, औद्योगिक प्रकल्पातील कामगारांचे प्रश्न, तसेच शासन पातळीवरील संवाद यांसह अनेक विषयांवर ठोस चर्चा झाली. दरम्यान सभाग्रहातील उपस्थितांची संख्या बघून श्री सत्यजीत रेड्डी ह्यांनी आयोजकांना काही सुचनाही दिल्या .
डॉ कैलाश कदम – श्री सीपी सिंह – सत्यजीत रेड्डी ह्यांनी मार्गदर्शन पर भाषणे केली.
बैठक यशस्वीपणे संपन्न झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला श्री गोविंदराव मोहिते महासचिव महाराष्ट्र इंटक – दिवाकर दळवी खजिनदार , निवृत्ति देसाई , श्री खानविलकर , मुकेश तिगोटे कार्यालय सचिव – दादाराव डोंगरे उपाध्यक्ष महाराष्ट्र इंटक , श्यामराव कुलकर्णी , दत्तात्रय पाटिल , दयानेश्वर कोळी , तुकाराम डेकाडे , विजय ठाकरे राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रपुर , वैभव पाटिल , पीके रमन , अरुण मात्रे , रमेश भोईर , आनंद ठाकुर व राज्यातील बहुसंख्य कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .
संचालन मुकेश तिगोटे व आभार प्रदर्शन खानविलकर ह्यांनी केले..



