Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeविरूर स्टेशनसुबई तलाठी सांझाच्या ग्राम महसुल सेवकाच्या मेहरबानीने रेती उपसा; मंडळ अधिकारी विरुर...

सुबई तलाठी सांझाच्या ग्राम महसुल सेवकाच्या मेहरबानीने रेती उपसा; मंडळ अधिकारी विरुर बनले धृतराष्ट्र !

 

सुबई ( प्रवीण चिड़े ता.प्र. राजुरा) : सुबई साझ्याच्या नाल्यातून अवैधरित्या रेती उपसा सुरू असून, तलाठीच्या मेहरबानीने हा धंदा फोफावत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत.

रात्रीच्या वेळी व दिवसा ट्रॅक्टर आणि हायवा मार्फत रेती तस्करी निर्भयपणे सुरू आहे, मात्र महसूल व पोलिस प्रशासन मौन बाळगत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाला महसुली तोटा होत असून, पर्यावरणीय हानीही होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने रेती माफियांचे मनोबल वाढले आहे. वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातूनही रेती उपसा होत असल्याचे समोर आले आहे.

प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून, महसूल व पोलिस विभागाने त्वरित छापा टाकून रेती तस्करी रोखावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

मी सुबई साजा येथे नुकताच रुजू झालो असून माझ्याकडे दोन गावांचा प्रभार आहे. त्यामुळे परिस्थितीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोतवाल संपावर असल्याने काही माहिती मिळण्यात विलंब होत आहे, अशी प्रतिक्रिया तलाठी परेश मैदमवार यांनी दिली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular