Friday, September 11, 2026
Google search engine
HomeChandrapurएनएचएआई च्या दुर्लक्षाचा अन् जीआर इन्फ्राच्या कामाचा बोगसपणा: राष्ट्रीय महामार्ग ३५३बी वर...

एनएचएआई च्या दुर्लक्षाचा अन् जीआर इन्फ्राच्या कामाचा बोगसपणा: राष्ट्रीय महामार्ग ३५३बी वर मुरुमाऐवजी पेरली काळी माती !

हर्दोना खुर्द (विशेष बातमी):

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-बी च्या निर्मिती आणि देखभालीतील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हर्दोना खुर्द परिसरात रस्त्याच्या कडेला आवश्यक असलेल्या कसदार मुरुमाऐवजी थेट ‘काळी माती’ टाकून कामाचा पुरता बोजवारा उडवला जात आहे. कंत्राटदार ‘जी. आर. इन्फ्रा’ आणि ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या या संगनमतामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.

मुरुमाऐवजी काळी मातीचा भराव:
नियमानुसार महामार्गाच्या कडेला मजबुतीकरणासाठी योग्य दर्जाचा मुरूम वापरणे बंधनकारक असताना, खर्चात कपात करण्यासाठी चिखल होणारी काळी माती वापरली जात आहे.

पावसाआधीच रस्ता धसला: अद्याप कोणताच जोरदार पाऊस झालेला नसतानाही, रस्त्याचे काठ खचण्यास सुरुवात झाली आहे.

अपघातांचा मोठा धोका:
चंद्रपूर, बामणी आणि राजुरा या महत्त्वाच्या औद्योगिक व निवासी भागाला जोडणाऱ्या या महामार्गावर रात्रंदिवस अवजड वाहनांची ये-जा असते. रस्त्याचे कडे खचल्यामुळे छोटी वाहने व दुचाकी उलटून भीषण अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
‘रिपेअरिंग’च्या नावाखाली जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न:
“काम अजून कंत्राटदाराकडेच आहे, ते पुन्हा दुरुस्त करून देतील” असे गुळमुळीत उत्तर देऊन राष्ट्रीय महामार्ग शाखा चंद्रपुर चे अधिकारी मोकळे होत आहेत. परंतु, सुरुवातीलाच निकृष्ट दर्जाचे काम करून सार्वजनिक निधीची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असलेल्या या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून जी. आर. इन्फ्रावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तात्काळ दर्जेदार मुरूम टाकून रस्ता मजबूत करण्यात यावा, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.
ह्याच जीआर इंफ्रा रोड निर्माण कंपनी ने तामशी इराई घाटातील रेतीचा अवैद्य उपसा करून करोड़ो रूपयाचा शासन महसुल बुड़वला आहे त्याची चौकशी खनिकर्म अधिकारी चंद्रपुर करित आहेत हे विशेष …

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular