Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिपरी रेती डिपोतून होणारी बेसुमार जडवाहतूक तात्काळ थांबवा; अन्यथा रस्ता पूर्णपणे फुटणार...

पिपरी रेती डिपोतून होणारी बेसुमार जडवाहतूक तात्काळ थांबवा; अन्यथा रस्ता पूर्णपणे फुटणार !

८ टन क्षमतेच्या रस्त्यावर धडधडत आहेत अतिजड वाहने; शिंदूर व परिसरातील ग्रामीण नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी घेतली तत्काल दखल

चंद्रपूर / शिंदूर (विशेष बातमी):
पिपरी रेती डिपोमधून होणाऱ्या प्रमाणाबाहेर अतिजड (ओव्हरलोड) वाहतुकीमुळे परिसरातील मुख्य ग्रामीण रस्ता पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केवळ ८ टन लोड क्षमतेसाठी बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त वजनाचे रेतीचे ट्रक व हायवा रात्रंदिवस धावत आहेत. ही जडवाहतूक तात्काळ न थांबवल्यास हा रस्ता पूर्णपणे फुटून बंद पडेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामीण भागाची मुख्य जीवनवाहिनी धोक्यात
नागाडा ते धानोरा तसेच शिंदूर व लगतच्या इतर ग्रामीण भागाला जोडणारा हा रस्ता परिसरातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

शाळकरी मुले व विद्यार्थी: दैनंदिन शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
*शेतकऱ्यांचा शेतमाल:* शेतातील पिकवलेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे.
*आरोग्य व आपत्कालीन सेवा:* गंभीर आजारी रुग्णांना तातडीने उपचारासाठी शहरात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला याच मार्गावरून जावे लागते.
मात्र, रेती डेपोच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता खचत चालला आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाला पत्राद्वारे इशारा व विनंती
या गंभीर समस्येची दखल घेत *महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (चंद्रपूर)* च्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकारी, -जिल्हा खनिकर्म अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना अधिकृत पत्र पाठवून *रेती वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची* आणि अतिजड वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांची तीव्र मागणी
शिंदूर व परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला असा इशारा दिला आहे की, जर पिपरी रेती डिपोमधून होणारी ही अवैध व अतिजड वाहतूक तात्काळ थांबवली नाही, तर रस्ता पूर्णपणे नष्ट होईल. त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही अपघाताला व नागरिकांच्या त्रासाला प्रशासनच जबाबदार राहील. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित पावले उचलून जडवाहतुकीवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

घाटधारक आणि संबंधित क्षेत्रातील तहसीलदार यांना तत्काल लेखी सूचना दिल्या जाणार , वाळू वाहतुकीचे रस्ते निश्चित करण्यासाठी उपाययोजना करू . 

श्री वसीम सय्यद जिल्हा खनिज अधिकारी चंद्रपुर

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular