Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurगडचांदूर ट्रॅफिक पोलिसांवर गंभीर आरोप  प्रशांत बनला प्रशांत महासागर .. हेड कॉन्स्टेबलच्या...

गडचांदूर ट्रॅफिक पोलिसांवर गंभीर आरोप  प्रशांत बनला प्रशांत महासागर .. हेड कॉन्स्टेबलच्या पदावरून कोट्यवधींची जमवली संपत्ती ? लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणी.

 

गडचांदूर / कोरपना तालुका प्रतिनिधी

गडचांदूर शहरातील ट्रॅफिक शाखेत कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल प्र.शांत यांच्यावर अल्प कालावधीत १ कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. पद सामान्य, पण जीवनशैली विलासी, यामुळे शहरात सतत चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर परिसरात काही ट्रक, टिपर – तंबाखू विक्रेता  आणि अवैद्य देशी दारू वाहतुक वाहनधारकांकडून दररोजच्या नियमित “वसुली” द्वारे लाभ घेतला जात आहे. वाहन चालकांच्या भाषेनुसार, काही वाहनांना विशेष संरक्षण, तर काहींना दंडाच्या नावाखाली थेट वसुली अशा प्रकारचे व्यवहार होत असल्याची चर्चा आहे.

नागरिकांचा प्रश्न हेड कॉन्स्टेबलच्या पगारात
➡️ नव्या चारचाक्या?
➡️ दुमजली घर?
➡️ रोख व्यवहार?
ही संपत्ती कशी उभी राहिली ? “कायद्याची अंमलबजावणी करणारा पोलीसच जर कायदा मोडत असेल, तर नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा ?”

स्थानिक नागरिक ; वाहतूक नियंत्रण की आर्थिक केंद्र?रोजच्या तपासणीत वाहन चालकांकडून घेतले जाणारे ‘ठराविक रेट’, व्यावसायिक वाहनांसाठी महिना पास संस्कृती, तर काही विशिष्ट ट्रक ऑपरेटर्सना मिळणारा विशेष मार्ग मोकळा —
या सर्वांवर आता जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे.लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणीस्थानिक सामाजिक संघटना, व्यावसायिक आणि रहिवाशांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर
यांच्याकडे स्वतंत्र तपासणी करण्याची औपचारिक मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रशासन शांत — जनता खवळलेली

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा शांत दिसत असली तरी
शहरात “हात तुपात, बोटं घशात” अशी चर्चा उधळली आहे. जनतेची मागणी विभाग अपेक्षित कारवाई ; ACB चंद्रपूर अवैध संपत्तीची तपासणी
पोलिस अधीक्षक, चंद्रपूर ट्रॅफिक शाखेचे गुप्त निरीक्षण-जिल्हा भ्रष्टाचार निरीक्षण समिती वसुली प्रकरणाची चौकशी करनार काय ह्याकड़े गड़चांदुर वासियांचे लक्ष्य लागले आहे .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular