Wednesday, June 17, 2026
Google search engine
HomeGadchandurश्रमिक मंथन'च्या बातमीचा महादणका: ढोंगी ठरलेला उत्पादन शुल्क विभाग अखेर जागा; भोयगावात...

श्रमिक मंथन’च्या बातमीचा महादणका: ढोंगी ठरलेला उत्पादन शुल्क विभाग अखेर जागा; भोयगावात ‘पेठे हॉटेल’च्या संचालकावर छापा, दारूसाठा जप्त !

पहिली बातमी १२ में ला प्रकाशित होताच १३ में ला पेटे च्या पत्नीवर अवैद्य दारू विक्रीची कारवाही …

.. एका महिन्यात दूसरी मोठी कारवाही १३ जून रोजी ..

आधी हप्तेखोरीचे आरोप, आता अबकारी विभागाची सारवासारव; वॉर्ड क्र. १ मधील कारवाईने तस्करांनी घेतला सावध पवित्रा !

गडचांदूर / भोयगाव:

‘श्रमिक मंथन’ने भोयगाव-गडचांदूर मार्गावरील ‘पेठे हॉटेल’च्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारूच्या काळ्या धंद्यांची पोलखोल करताच, परिसरात एकच खळबळ उडाली होती. हप्ते खाऊन डोळे मिटून बसलेल्या उत्पादन शुल्क (Excise) विभागाच्या ढोंगी कारभारावर बातमीतून थेट आसूड ओढण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत, अखेर आपली अब्रू वाचवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग जागा झाला आहे. शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी सकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भोयगाव येथील वॉर्ड नंबर १ मध्ये धडक छापा टाकून अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
या धडक कारवाईची आणि जप्त केलेल्या मालाची पडताळणी थेट घटनास्थळावरील अधिकृत नोंदींवरून झाली असून, यामुळे अवैध धंदेवाल्यांनी सावध पवित्रा घेतला आहे . सोबतच उत्पादन विभागाच्या राजुरा येथील कनिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवस बंद ठेवा अश्या सूचना पण दिल्याचे समजते .
भोयगाव वॉर्ड क्र. १ मध्ये उत्पादन शुल्कची धाड !
प्राप्त माहितीनुसार, १२ जून रोजी सकाळी ९:५३ वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोयगाव वॉर्ड क्र. १ मधील संशयास्पद अड्ड्यावर आणि पेठे हॉटेलच्या साठवणुकीच्या जागेवर छापा टाकला. या छाप्यात जमिनीवर अस्ताव्यस्त साचवून ठेवलेला अवैध देशी व विदेशी दारूच्या शेकडो बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. बातमीचा रेटा एवढा मोठा होता की, नेहमी पाठराखण करणाऱ्या या विभागाला स्वतःहून पुढे येऊन ही कारवाई करावी लागली.

आता गडचांदूर पोलीसचे बीट जमादार आनंद कथडेचे काय ?
उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून स्वतःवरचे डाग धुण्याचा प्रयत्न केला असला, तरी गडचांदूर पोलीस ठाण्याचे बीट जमादार *आनंद कथडे* यांच्या भूमिकेवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. या क्षेत्राचे रक्षक असूनही आनंद कथडे यांच्या नाकाखाली हा लाखो रुपयांचा अवैध धंदा कसा चालत होता? आणि प्रत्येक अवैध धंद्यांची ‘मासिक एंट्री’ जमादार कथडेकडे जात असल्याच्या आरोपांचे काय ? हा मुख्य प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

हितेश चव्हाण यांनी ८ मे रोजी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री उईके यांची भेट घेऊन या संपूर्ण भ्रष्टाचाराची अँटी करप्शन ब्युरो (ACB) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘श्रमिक मंथन’ने या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच अखेर उत्पादन शुल्क विभागाला कारवाई करणे भाग पडले.

श्रमिक मंथन’चा रोखठोक इशारा
उत्पादन शुल्क विभागाने केवळ देखाव्यापुरती ही कारवाई केली की यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत ते पोहोचणार, दारुच्या बैच नंबर वरुन सहज माहिती मिळते की हा दारू पुरवठा कोणत्या देशी भट्टी मधुन झाला मग देशी भट्टी वर कारवाही करणार की नाही ? यावर आमचे बारीक लक्ष आहे. तसेच, पोलिसांच्या गोटात बसून ‘आनंदी आनंद’ घेणाऱ्या वसुली बहाद्दर जमादारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कधी कारवाई करतात, याची वाट भोयगाव ; कवठाला; लखमापुर हरदोना येथील जनता पाहत आहे !

*उच्च स्तरीय गोपनीय चौकशी सुरु आहे . पुरवठा दार दारू दुकानदार यांचे विरुद्ध वरिष्ठतम अधिकारी यांचे सोबत चर्चा करून निर्णय घेऊ*. चंद्रशेखर दारोडे सब इंस्पेक्टर राज्य उत्पादन विभाग राजुरा ३ 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular