Wednesday, June 17, 2026
Google search engine
HomeGadchandurगडचांदूरमध्ये पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट; 'झिरो' रीसेट न दाखवता मारला जातोय डल्ला,...

गडचांदूरमध्ये पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट; ‘झिरो’ रीसेट न दाखवता मारला जातोय डल्ला, ‘साई फ्यूल पंप’वर गोरखधंदा जोरात !

गडचांदूर:
गडचांदूर आणि परिसरातील वाहनधारकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. येथील स्थानिक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना लुटण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. ग्राहकांनी मागितलेल्या रकमेपेक्षा कमी रकमेचे पेट्रोल गाडीत टाकून दररोज हजारो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

नजर चुकवून फसवणुकीचा नवा फंडा
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल भरताना कर्मचारी ग्राहकांची नजर चुकवून पेट्रोल पंपाचे मीटर ‘झिरो’ (0.00)करत नाहीत. आधीच्याच ग्राहकाच्या आकड्यावरून पुढील ग्राहकाला पेट्रोल देणे सुरू केले जाते.

उदा. एखाद्या ग्राहकाने १००० रुपयांचे पेट्रोल मागितले, तर त्याची नजर चुकवून त्याला प्रत्यक्षात केवळ ८०० रुपयांचेच पेट्रोल दिले जाते आणि उर्वरित २०० रुपयांचा चुना सरळ ग्राहकाला लावला जातो.

या लुटमारीमध्ये गडचांदूर येथील साई सर्विस स्टेशन (‘अनंत फ्यूल पंप’ ) सध्या सर्वात जास्त चर्चेत असून, येथे ग्राहकांची लूट मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. सदर आरोपाची पुष्टी श्रमिक मंथन करित नसून ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी बघता यावर शासकीय वजन-माप विभागाने लक्ष दयावे अशी मागणी जोर धरत आहे.

‘भारत पेट्रोलियम’चे अधिकारी ‘भारत गौर’ यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकांचे एवढे मोठे नुकसान होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
इतकेच नव्हे तर, ह्या पंपा वर ग्राहकांसाठी सुलभ सौचालय – मोफत हवा केंद्र नाहीत तरी देखील गेल्या ६ महिन्यापासून भारत गौर यांनी तपासणी/निरीक्षण अहवाल घेताना ह्यावर त्यांचे लक्ष का गेले नाही ह्याचे ऊत्तर सद्या तरी अन उत्तरित आहे . भारत गौर यांना सतत त्यांची भूमिका जानून घेण्यासाठी त्यांचे मोबाइल फोन वर संपर्क केला असता नेहमी प्रमाणे आजही त्यांनी प्रतिसाद दिला नाही . त्यामुळे त्यांचे द्वारे खोटे व बनावटी पंप निरीक्षण असवाल तयार केल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पंपांवर सर्व आलबेल असल्याचे भासवून दोषींना पाठीशी घालण्याचे काम हे अधिकारी करत आहेत का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

भारत पेट्रोलियम मंत्रालय चौकशी करणार का ?
सामान्य जनतेच्या खिशावर पडणारा हा दरोडा थांबवण्यासाठी आता थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने यात हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावटी अहवालांची चौकशी होणार का?
‘अनंत फ्यूल पंप’ सारख्या लुटमार करणाऱ्या पंपांचे परवाने रद्द होणार का?
याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्राहकांना जाहीर आवाहन: ‘झिरो’ बघितल्याशिवायपेट्रोल भरू नका !
सतर्क राहा, सुरक्षित राहा  ।। ।। सर्व वाहनधारकांना सप्ताहिक श्रमिक मंथन तर्फे आवाहन करण्यात येते की, गडचांदूर किंवा इतर कोणत्याही पंपावर पेट्रोल भरताना कर्मचाऱ्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता . मशीनवर ‘0.00’ ची नोंद झाल्याची स्वतः खात्री करा आणि मगच पेट्रोल भरा. आपली फसवणूक झाल्यास त्वरित रीतसर तक्रार नोंदवा.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular