गडचांदूर (प्रतिनिधी):
गडचांदूर नगर परिषदेतील प्रशासनावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट आले आहे. मुख्याधिकारी यांच्यावर विविध विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेत मनमानी आणि ठेकेदारांना अनुचित लाभ देण्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी च्या दोन्ही बाजूने गड़चांदुर शहरात नाली बांधकाम सुरु आहे . नाली बांधकाम व सुलभ शौचालय साठी NHAI ने दोन कोटी पन्नास लाख रुपये दिले. ह्या कामामध्ये ठरवलेल्या नियमानुसार कामकाज न करता निवडक ठेकेदारांना थेट कंत्राट देण्यात आल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, काही कामांचे देयक पूर्ण न झाल्याने ठेकेदार व कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, चव्हाण यांनी मनमानी पद्धतीने कामांची मंजुरी देऊन आर्थिक लाभ मिळवला असून, प्रशासन पारदर्शकतेपासून दूर गेले आहे.
नगर परिषद कार्यालयातील अक्षय पाटील बांधकाम अभियंता व विशिष्ट कर्मचाऱ्यांनीही अंतर्गत गैरव्यवहारांविषयी मौन बाळगल्याने संशय अधिक गडद होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शहरातील समाजसेवक संतोष पटकोटवार व माजी नगरसेवकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी अशिष चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांच्या वर झालेल्या आरोपाबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तथापि, नागरिक व स्थानिक संस्था या चौकशीच्या मागणीवर ठाम असून या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे पटकोटवार यांनी स्पष्ट केले आहे. बसस्टैंड परिसरात सुभल शौचालय बांधकाम करण्यासाठी सुद्धा निधि NHAI द्वारे देण्यात आला आज महिला व पुरुष सुयोग नगर कड़े जाणाऱ्या रस्त्यालगत उघड़यावर लघविला जातात त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे घानीने माखलेला दिसत आहे तरी पण मुख्यधिकारी डोळेझाक करीत आहे यामुळे स्थानिक रहिवासी कमालीचे संतापले आहेत.
गडचांदूरमधील या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे नगर परिषदेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. नगर परिषद मधील एका अधिकाऱ्याने श्रमिक मंथन ला नाव न छापन्याच्या अटीवर माहिती दिली की , सद्या लोकल बॉडी नसल्याने १०% कमिशन घेतल्या जात आहे . स्थानिक बांधकाम विभागील बाबू कमीशन रक्कम जमा करतात आणि मग ती वितरित केली जाते . प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी गड़चांदुर शहर वासीयाद्वारे होत आहे .



