Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeChandrapurपैनगंगा नदीपात्रात हड़स्ती पुलाजवळ अवैध रेती चोरीचा धडाका जनप्रतिनिधीच्या संगनमताने रेत तस्करीचे...

पैनगंगा नदीपात्रात हड़स्ती पुलाजवळ अवैध रेती चोरीचा धडाका जनप्रतिनिधीच्या संगनमताने रेत तस्करीचे आरोप !

चंद्रपूर ( प्रतिनिधी )
हडस्ती पुलापासून काही अंतरावर, शिवणी ग्राम परिसरात पैनगंगा नदीपात्रात दिवसा ढवळ्या पोकलेन मशिनच्या सहाय्याने अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत तब्बल २००० हून अधिक ब्रॉस रेती चोरी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, ही रेती चोरी अत्यंत संघटित पद्धतीने चालवली जात असून, प्रशासनातील काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या नावाचा वापर करून या तस्करीला संरक्षण मिळत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अशा प्रकारच्या रेती तस्करीमुळे शासनाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे.

सन २०२४ पासून सत्तेवर असलेल्या राज्य सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वी असे कृत्य जनप्रतिनिधींनी थेट पाठीशी घालून केलेले दिसत नव्हते, मात्र आता परिस्थिती बदलली असून रेती तस्करीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

सूत्रांनुसार, शिवणी ग्राम नजिकचे रेत व्यावसायी शेंडे व बोंदरे हे दोन व्यावसायिक या अवैध रेती उत्खननात सक्रिय असून, त्यांनी पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

संबंधित महसूल, पोलीस आणि पर्यावरण विभाग मात्र या सर्व प्रकारावर मौन बाळगताना दिसत आहेत. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशा बे-जबाबदार कृत्यामुळे माननीय महसुल मंत्री बावनकुले ह्यांची मात्र किरकिरी वाढली आहे असे भाजपच च्या एका प्रामाणिक कार्यकर्त्यांनी खासगीत कळवून खंत व्यक्त केली. आणि पक्ष्याच्या वरिष्ठ पक्ष श्रेष्ठिनि ह्या कड़े लक्ष्य देण्याची गरज असल्याचे बोलून आपल्या भावनानां मोकळी वाट करून दिली . भाजपा पक्ष श्रेष्ठि अश्या नव नवीन अवैद्य व्यावसायात उतरलेल्या पदाधिकारी विरुद्ध कारवाही करणार का ह्यकडे जिल्ह्यातील पक्षनिष्ट यांचे लक्ष लागले आहे ..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular