Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeविरूर स्टेशनराष्ट्रीय एकता दिनानिमित्त विरुर पोलिस स्टेशनतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विरुर पोलिस स्टेशनतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

 

प्रविण चिडे विरुर :-  राजुरा तालुका प्रतिनिधी

एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशाचे लोखंडपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यासाठी विरुर पोलिस स्टेशन यांच्या वतीने Run for Unity मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात विरुर वॉकिंग ग्रुप, ग्रामसेवा ग्रुप तसेच स्थानिक युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सकाळी 6 वाजता लवकरच पोलिस स्टेशनसमोरून मॅरेथॉनला सुरुवात झाली. सुमारे ५ किलोमीटर अंतराच्या चालण्याच्या स्पर्धेत सहभागी नागरिकांनी एक भारत,श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दुमदुमवला. देशातील एकता,बंधुत्व आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देत सहभागी युवकांनी उत्साहाने पावले टाकली.

या उपक्रमाचे नियोजन विरुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मा.संतोष वाकडे, पीएसआय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून उपस्थिती लावली.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकतेचा संकल्प घेतला. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजात एकतेचा, देशभक्तीचा आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचवण्यात आला.

एक भारत, श्रेष्ठ भारत!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular