Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurगडचांदुरचे संजय मेढी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हा काँग्रेसच्या कोर कमिटी बैठकीत झाला...

गडचांदुरचे संजय मेढी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हा काँग्रेसच्या कोर कमिटी बैठकीत झाला पक्षप्रवेश

 

चंद्रपूर ( विजय ठाकरे )
आज चंद्रपूर येथील सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्व जिल्हा कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान गडचांदुर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय मेढी यांनी अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी मंचावर लोकनेते मा. विजय वडेटटीवार (आमदार तथा लोकलेखा समिती अध्यक्ष, महाराष्ट्र शासन), जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, तसेच लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय मेढी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गडचांदुर नगर परिषद निवडणुकीत पक्षाला मोठा बळ मिळेल, अशी आशा जिल्हा नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली. स्थानिक स्तरावर मेढी हे जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

या कार्यक्रमास अशोक बावणे (सभापती, कृषि उत्पादन बाजार समिती, कोरपना), युवा नेते सचिन भोयर (माजी नगर उपाध्यक्ष),आशीष देरकर उप-सरपंच बीबी , सुनील झाड़े, महादेव हेपट, आकाश वराटे आदींची उपस्थिती लाभली.

बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि युवा वर्गाला राजकारणात सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी पुढील धोरण ठरविण्यात आले.

काँग्रेसमध्ये झालेल्या संजय मेढी यांच्या प्रवेशामुळे गडचांदुर परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular