जिल्हा प्रतिनिधी ( चंद्रपुर )
डब्ल्यूसीएल घुग्गुस ओपनकास्ट खाणीतील ओव्हरबर्डन (OB) चोरीच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गुन्हा नोंद होऊन आठ दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींची वाहनं जप्त केली नाहीत, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गुन्हा नोंद – पण कारवाई शून्य
मागील आठवड्यात तीन ट्रक – MH34-BG7088, MH40-1008 आणि MH34-BZ9334 – हे नकोडा गावाजवळील डब्ल्यूसीएलच्या ओपनकास्ट खाणीमधून ओव्हरबर्डन माती अवैधरित्या वाहतूक करताना पकडले गेले. सुरक्षा रक्षक राशिद शेख यांनी चालकांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला. यानंतर घुग्गुस पोलिस ठाण्यात वाहन चालक-मालका विरुद्ध बीएनएस 2023 अंतर्गत कलम 303(2) व 62 गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपिचा शोध शुरु झाल्याची माहिती घुग्गुस पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तायवाड़े कडून मिळाली.मात्र, गुन्हा नोंदवूनही आठ दिवस उलटले, आणि वाहनं अजूनही जप्त करण्यात आलेली नाहीत.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “गुन्हा दाखल करून पोलिसांनी केवळ औपचारिकता पूर्ण केली आहे; प्रत्यक्ष कारवाई होत नाही.”
पोलिसांवर संशयाचे सावट
घुग्गुस पोलिस ठाण्याने “आरोपी फरार असल्यामुळे शोध सुरू आहे” असे सांगितले असले तरी,
वाहन क्रमांक पोलिसांकडे असूनही वाहनं शोधली जात नाहीत, ही बाब नागरिकांना धक्कादायक वाटते.
त्याचबरोबर, या प्रकरणात महसूल विभागाकडूनही गौण खनिज कायद्याअंतर्गत पंचनामा किंवा वाहन जप्तीची कारवाई झाली नाही. यामुळे दोन्ही यंत्रणांवर आरोपीना वाचवण्याचा आरोप होत आहे.
कायद्याने काय सांगितले आहे?
महाराष्ट्र लघु खनिज नियम 2013 नुसार,
जर कोणत्याही व्यक्तीने शासन परवानगीशिवाय माती, वाळू, ओव्हरबर्डन किंवा इतर गौण खनिज वाहतूक केली, तर वाहन जप्त करून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. तरीही नायब तहसीलदार सचिन खंडाले महसूल प्रशासन चंद्रपुर यांनी गौण खनिज नवीन धोरण 2025 अनुसार घुग्गुस पोलिसां तर्फे गुन्हा नोंद होऊन आठ दिवस झाले असताना देखील कोणतीही संयुक्त कारवाई केली नसल्याने, शासकीय यंत्रणांच्या निष्क्रियतेचा मुद्दा अधिक ठळक झाला आहे.
स्थानिक नागरिक म्हणाले —
“घुग्गुस वेकोलि परिसरात गौण खनिजाची ( ओबी ) अवैध वाहतूक दिवस-रात्र सुरु राहते तक्रार दिली की थोड़े दिवस बंद होते नंतर जैसे थे । वेकोलींचे भ्रष्ट अधिकारी आणि महसुल विभागाचे नायब तहसीलदार – मंडळ अधिकारी ह्यां अवैद्य गौण खनिज तस्करीत मुख्य शंषयित आहेत कारण ते नेहमीच इकडे कानाडोला करतात . एकूणच पोलिसांच्या कारवाही कड़े स्थानिक जनतेचे लक्ष्य लागले आहे ..
#घुग्गुस पोलिस अधिकारी यांच्या प्रतिक्रिया#
मि रजेवर आहे . कृपया चौकशी अधिकारी तायवाड़े ह्यांचे कडून अधिकृत माहिती घ्या..
प्रमोद राउत , निरीक्षक पोलिस स्टेशन घुग्गुस
——– ——– ——- ——- —— —- ——- —— —— —
कलम 307 च्या गंभीर प्रकरणात प्राथमिकतेने गुन्हेगार शोध शुरु आहेत . सणासुदीचे दिवस आहेत. स्टाफ पण कमी आहे तरी देखील आरोपी व वाहन लवकर जप्त करू..
सचिन तायवाड़े एपीआय पोलिस स्टेशन घुग्गुस



