Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurराजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

गड़चांदुर प्रतिनिधी

 

राजुरा-गड़चांदुर मार्गावर दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्रो अंदाजे ७:५० चे दरम्यान केटीसी लॉजेस्टिक वाहनतळ अधिक इंधन पंप समोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाली अपघातग्रस्त वाहनाचे सुरक्षा एयर बैग वेळेत खुल्ल्याने मोठी दुर्घटना टळली .

मिळालेल्या माहिती नुसार
तेलंगाना राज्य पासिंग ट्रक क्रमांक TS09UC0951 मध्ये सीमेंटची पोती भरली होती . हे वहान चुकीच्या ठिकाणी स्लो झाले व डीजल भरण्यासाठी डाव्या बाजूने वळले तीतक्यात मागून येणारे लाइट मोटर वाहन क्रमांक MH34BF4570 गड़चांदुर कड़े येत होते . ह्या दोन पदरी रस्त्यावर डाव्या बाजूला दोन ट्रक डीजल भरण्यासाठी उभे होते . एक ट्रक पुढे व अन्य ट्रक बाजूला उभे असल्यामुळे वाहन चालक गोंधळला आणि हा भीषण अपघात झाला . अपघात ऐवढा भीषण होता कि दूरवर्ती मोठा आवजः झाला . ट्रैफिक पोलिस गड़चांदुर ह्यांनी अपघातग्रत वाहन चालकाची मद्य सेवन करून नव्हता ह्याची पुष्टि केली त्यामुळे केटीसी कंपनी व्यवस्थापनाने केलेले आरोप हे फक्त आपले हात झटकन्यासाठी केले ह्या घटने वरुन दिसून येते .

गेल्या दोन वर्षात अंबुजा सीमेंट कंपनीच्या तीन कामगाराचे अपघात ह्या केटीसी कंपनीच्या वाहन
तळ व इंधन पंप ह्या ठिकाणी झाले त्यापैकी एक कामगार मरण पावला व दोन किरकोळ जख्मी झाले . महीनाभरा पूर्वी कुमार नामक कामगारा चा अपघात ह्या ठिकाणी झाला होता आणि आजचा अपघात बघिलता तर ह्यवरुन हे सिद्ध होत आहे पोलिसांचे पाठबल व साठगांठ असल्यामुळे ट्रांसपोर्ट कंपन्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ट्रान्सपोर्टच्या वाहनांची बेफाम वाहतूक आणि नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, ट्रान्सपोर्ट यार्डसमोर वारंवार अपघात घडत आहेत, पण तरीही वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासन ठोस कार्यवाही होत आहे. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निर्दोष नागरिकांचा जीव जात आहेत.

👉केटीसी वाहनतळ व इंधन पंप समोर सड़क सुरक्षेसाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे , हया जीवघेण्या वाहनतळ व इंधन पंप ठिकानी निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार काय हा देखील प्रश्न उद्भवत आहे..
राष्ट्रीय महामार्गावर एनएचएआयची परवानगी व सड़क सुरक्षेचे नियम व शर्ती पालन करणारे हमीपत्र एनएचएआय ला दिले काय अन्यथा अश्या बेकायदेशीर वाहनतळ व इंधन पंप विरुद्ध कारवाही कौन करणार हे प्रश्न सद्या तरी अन उत्तरित आहेत.

या ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर्स, सोलार सिग्नल आणि ट्राफिक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा विजयक्रांती कामगार संघटनेने दिला आहै..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular