प्रवीण चिड़े राजुरा तालुका प्रतिनिधि
राजुरा ( दिनांक ३० )
“कायदा आणि सुव्यवस्था राखणारे” असे नाव असणाऱ्या पोलिस विभागावर लोकांचा विश्वास बसायला हवा, पण राजुरा व गडचांदुर परिसरातील वास्तव त्याच्या नेमक्या उलट आहे. ठेका कंपनी लेबर कॉलनी उप्परवाही येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे. धक्कादायक म्हणजे या धंद्यामागे स्थानिक पोलिसांचेच आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

पोलिसांच्या छत्रछायेखाली धंदा
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचांदुर पोलिस ठाण्याचा बिट जमादार आनंद आणि राजुरा पोलिस स्टेशनमधील काही अधिकाऱ्यांचे गट हे या अड्ड्यांना थेट पाठबळ देत आहेत. “आम्ही दोघ पोलिस भाऊ – मिळून मिसळून खाऊ,” असा जाहीर कबुलीजबाब देत असल्यासारखी वर्तणूक काही पोलीस करत असल्याची कुजबुज सर्वत्र आहे.
हा अवैध धंदा केवळ छोट्या पातळीवर नसून, रात्री-दिवसा चालणाऱ्या विक्री केंद्रांवरून रोज लाखोंची उलाढाल होते. त्याबदल्यात दर आठवड्याला पोलिसांना हप्ते पोहोचतात, अशी स्थानिकांची खात्री आहे.
राजुरा ठाणेदारांचे ढोंगी आश्वासन नागरिक त्रस्त – सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
दारूच्या या मुक्त विक्रीमुळे परिसरातील वातावरण बिघडले आहे. शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुली, महिला आणि कुटुंबे यांना रात्री सुरक्षितपणे वावरणे कठीण झाले आहे. दारूच्या नशेतून भांडणं, मारामाऱ्या, गुन्हेगारी कृत्ये सतत वाढत आहेत.
“पोलिस ठाण्यात तक्रार नेली तर उलट आमच्यावरच दबाव आणला जातो. आम्ही दारूबाजांविरोधात तोंड उघडलं तर रात्री धमक्या मिळतात. हाच न्याय आहे का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वरिष्ठांकडे जनतेची आर्त हाक
या प्रकरणामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलिस अधिकारी, अगदी गृह विभागालाही प्रश्न विचारले जात आहेत –
कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण देणारे पोलीसच जर आरोपी झाले तर सामान्य माणूस कुणाकडे धाव घ्यायची? पोलिसांच्या संगनमतामुळे निर्माण झालेल्या गुन्हेगारी वातावरणावर कुणी अंकुश लावणार का?
उप्परवाही ग्राम नजिकच्या ठेका कंपनीच्या लेबर कॉलनी मधील अवैध दारू धंदा हा केवळ एक ‘लोकल प्रॉब्लेम’ नसून, तो पोलिस प्रशासनाच्या नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून, लवकरच या प्रकरणावर खऱ्या अर्थाने धडक मोहीम न राबवल्यास जनतेचा विश्वासच उडेल.
लोक म्हणतात “दारूबाजांची ताकद नाही, ताकद आहे ती पोलिसांच्या पाठबळाची.”
आता पाहायचं म्हणजे, वरिष्ठ अधिकारी खरोखरच भ्रष्ट पोलिसांविरुद्ध हात उचलतात का, की पुन्हा एकदा प्रकरण धुळीत मिळत ह्यकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे..
मला ह्या बाबत पूर्ण माहिती नाही मला माहिती दिली आता कारवाही निश्चित केल्या जाईल . परतेकी ठानेदार राजुरा
रविवार असल्यामुळे मि उप्पवाही मार्केट मध्येच गस्ती वर होतो मला अस अवैद्य दारू विक्री दिसली नाही ;- आनंद बिट जमादार गड़चांदुर पोलिस स्टेशन



