Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचांदूर परिसरातील वीज समस्या सुटणार! २१ 'एबी' स्विच बसविण्याच्या कामास त्वरित सुरुवात...

गडचांदूर परिसरातील वीज समस्या सुटणार! २१ ‘एबी’ स्विच बसविण्याच्या कामास त्वरित सुरुवात करण्याची रोहन काकडे यांची मागणी

आमदार देवराव दादा भोंगळे यांना भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रोहन काकडे यांनी सोपवले निवेदन

गडचांदूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) अंतर्गत डीपीडीसी (DPDC) योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २१ एअर ब्रेक (AB) स्विच बसविण्याच्या कामास विनाविलंब सुरुवात करण्यात यावी, अशी आग्रही मागणी *भारतीय जनता युवा मोर्चा (चंद्रपूर) चे माजी जिल्हा उपाध्यक्ष रोहन रमेश काकडे* यांनी *विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. देवराव दादा भोंगळे* यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

प्रशासकीय मंजुरी मिळूनही काम रखडले !
बल्लारशाह ओ अँड एम (O&M) विभागामार्फत या महत्त्वपूर्ण कामासाठी ₹५,४८,१४० (पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे चाळीस रुपये) इतक्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत *EE/O&M/Dn/B’shah/T/Estt/DPDC(Gen)/2025-26/No.12* या आदेशान्वये काम मंजूरही झाले आहे. मात्र, प्रशासकीय मंजुरी मिळून बराच काळ लोटला तरी अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“२१ एअर ब्रेक (AB) स्विच बसविण्याच्या या कामामुळे परिसरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट होईल. वारंवार वीज खंडित होण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार असून, त्यांना दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे या कामात कोणताही विलंब न करता ते तातडीने सुरू करावे.”
रोहन रमेश काकडे *(माजी उपाध्यक्ष, भाजयुमो, चंद्रपूर)*

नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

उन्हाळा असो वा पावसाळा, परिसरातील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त असतात. हे २१ ‘एबी’ स्विच बसविल्यास वीज प्रवाह सुरळीत ठेवण्यास तांत्रिक मदत होणार आहे. नागरिकांची हीच अडचण ओळखून रोहन काकडे यांनी थेट आमदारांचे लक्ष वेधले असून, आता आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या माध्यमातून संबंधित विभाग या कामाला तातडीने गती देईल, अशी आशा गडचांदूर आणि परिसरातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular