Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurखिरडी गावाजवळ अपघातांचे जाळे – ट्रान्सपोर्ट मालकाची मुजोरी- गड़चांदुर पोलिस ची धड़क...

खिरडी गावाजवळ अपघातांचे जाळे – ट्रान्सपोर्ट मालकाची मुजोरी- गड़चांदुर पोलिस ची धड़क कारवाही

  • गडचांदूर : कोरपना-गडचांदूर महामार्गावरील खिरडी गावाजवळ अपघाताचे संकट सतत घोंगावत आहे. आज कांग्रेस पक्षाची कोरपना येथील सभा आटोपुन कार्यकर्ते गड़चांदुर कड़े परत येत असताना नुकताच किरकोळ अपघात घडला; मात्र स्थानिक नागरिकांचा इशारा आहे की हे ठिकाण मोठ्या दुर्घटनेचे केंद्र बनत चालले आहे.

यामागे बालाजी ट्रान्सपोर्ट मालकाची उघड मुजोरी आणि आरटीओ चंद्रपुरचे संरक्षण याला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग कायद्याचे उघड उल्लंघन करून विना परवानगी कृषी जमिनीचा बेकायदेशीर अकृषक वापर केला जात आहे.आश्चर्याची बाब म्हणजे कोरपना तहसीलदार याच रोड नि रोज जाने-येने करतात परंतु त्यांनी अश्या प्रकारे कृषी जामिनिचा गैर वापर होत असल्याबाबत जाब विचारला नाही . नादूरुस्त वाहनाची दुरुस्ती व देखभाल करताना ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तेल, ग्रीस आणि डिझेल रस्त्यावर अवास्तव फेकत असल्याने प्रदूषण होत आहे , परिणामी महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाचा जीव धोक्यात आला आहे .त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल माजी आमदार सुभाष धोटे यांनी घेतली असून, त्यांनी एसडीपीओंना मोबाइल फोन वर बोलून तत्काल दखल घेण्याचे सूचित केले आहे. यानंतर एसडीपीओं जाधव यांनी तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या,

सूचना मिळताच गड़चांदुर पोलिस स्टेशनचे ठानेदार शिवाजी कदम ह्यांनी वाहतूक पोलिसची टीम घटना स्थळावर पाठउन ७ वाहना वर अवैद्य पार्किंग ची कार्यवाही केल्याची माहिती कॉन्स्टेबल रामपवार ह्यांनी दिली . आजच्या कारवाही मुळे बालाजी ट्रांसपोर्टला शिकवण मिळेल हयात शंका नाही.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular