Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeChandrapurराजुरा विधानसभा क्षेत्रात भाजप नेत्यांची दुबार नावे

राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजप नेत्यांची दुबार नावे

 

राजुरा : देशभरात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मत चोरीच्या मुद्द्याने आधीच खळबळ माजवली आहे. निवडणूक आयोग व भाजपचे वरिष्ठ नेते यावर स्पष्टीकरण देत असतानाच आता महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजप नेत्यांच्या दुबार नावे समोर आल्याने मोठा वाद उफाळून आला आहे.

▪️ भाजपचे माजी गडचांदूर शहराध्यक्ष गडचांदूर नगर परिषदेचे माजी स्वीकृत सदस्य तथा कोरपना तालुका महामंत्री सतीष उपलेंचीवार यांचे वास्तव्य नांदा येथे नसताना सुद्धा त्यांचे नाव थेट नांदा येथील मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नीचे व मुलीचे नाव हे गडचांदूर नगर परिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट आहे

▫️ जीवती पंचायत समितीचे माजी सभापती व भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश देवकते यांचे नाव जिवती तालुक्यातील वणी (बुज.) येथे मतदार यादीत असून त्यांचे नाव गडचांदूर नगर परिषदेतील मतदार यादीत समाविष्ट आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

▪️भाजप युवा नेते व उद्योजक निलेश ताजणे यांचे नाव गडचांदूर नगरपरिषदेसह बाखर्डी ग्रामपंचायत या दोन ठिकाणच्या मतदार यादीत नोंदवलेले आहे विशेष म्हणजे यापूर्वी ताजने यांनी गडचांदूर नगर परिषदेची निवडणूक लढवली होती.

दुबार नावे आणि निवडणुकीवर परिणाम

राजुरा विधानसभा क्षेत्रातील या घडामोडी गंभीर स्वरूपाच्या आहेत. कारण, जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीच दोन ठिकाणी नावे असतील, तर कार्यकर्त्यांची व सामान्य मतदारांचीही अशीच दुबार नावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, नगरपरिषद निवडणुकीत एकदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा मतदान करण्याची संधी भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना मिळते, हे स्पष्ट होते.

यामुळे केवळ निवडणूक प्रक्रियेचा गैरफायदा घेतला जात नाही, याचा निवडणुकीचा निकालावरही परिणाम होत असतो यामुळे लोकशाहीची मूलभूत पायाभरणीच डळमळीत केली जात आहे.

काँग्रेसकडून आक्रमक भूमिका

याबाबत काँग्रेस पक्षाकडून उपविभागीय अधिकारी, राजुरा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील दुबार नावे तातडीने वगळून भाजप नेत्याच्या दुबार नाव नोंदणी बाबत चौकशी मागणी केली जाणार असून भाजप नेत्यांच्या नावाने दोन दोन ठिकाणी मतदान नोंदणी कशी काय केली याबाबत लवकरच पत्रकार परिषदेतून माहिती दिली जाणार आहेत ,

भाजपच्या नेत्यांना निवडणूक आयोगाकडून दुबार नावे ठेवण्याची सूट मिळाली आहे का? हा प्रश्न जनतेत उपस्थित झाला आहे. जर नेतेच दुबार नावे ठेवून मतदान करत असतील, तर संपूर्ण कार्यकर्तावर्गाने त्याच पद्धतीने मत चोरी केली असल्याची शंका निर्माण होते.”*

मत चोरीच्या मुद्द्याला नवी धार

देशभरात सध्या “मत चोरी” हा राजकीय वादविवादाचा केंद्रबिंदू ठरत असताना, राजुरा विधानसभा क्षेत्रातील ही घटना भाजपसाठी आणखी डोकेदुखी ठरू शकते. निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुबार नावे वगळली नाहीत, तर लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होईल, अशी चर्चा जनतेत सुरु झाली आहे.

राजुरा विधानसभा मतदार संघात माझे नाव गड़चांदुर आणि नांदा येथे आहे हे जरी खरे असले तरी नांदा ग्राम पंचायत यादीत माझे नाव चुकुन राहिले आहे .  हयात मतदार म्हणून माझी चूक नाही . निवडणूक आयोगाने यादी अपडेट करायला हवी . सतिश उपलंचीवार

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular