Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeGadchandurखिर्डी व बाखरडी तेथील शेतीजमिनीवर बेकायदेशीर ट्रान्सपोर्ट यार्ड बालाजी रोडलाइन व केएफटी...

खिर्डी व बाखरडी तेथील शेतीजमिनीवर बेकायदेशीर ट्रान्सपोर्ट यार्ड बालाजी रोडलाइन व केएफटी ट्रांसपोर्ट चा प्रताप –महसुल प्रशासनाकडून फक्त दंड, जबाबदारांवर गुन्हा का नाही?


कोरपना (गौतम भसारकर ता. प्रतिनिधी) – मौजा खिर्डी येथील गट क्र. २६/३ (अ)या शेतीजमिनीवर कायद्याला धाब्यावर बसवत बेकायदेशीर बालाजी रोडलाइन पुणे येथील व्यावसायीका कडून ट्रान्सपोर्ट यार्ड उभारण्यात आले आहे. शेतीजमिनीचा अकृषक वापर करण्यास परवानगी आवश्यक असतानाही संबंधितांनी कोणतेही कागदपत्र न घेता थेट यार्ड सुरू केले. तहसीलदारांनी केवळ दंडात्मक कारवाई करून थातुरमातुर काम भागवले असले तरी हा प्रकार गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडतो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी न घेता ट्रान्सपोर्ट यार्ड उभारले गेले असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली असून, मोठ्या दुर्घटनेला जबाबदार कोण राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भोयगाव रस्त्यालगत बाखरडी गावच्या बस स्टॉपच्या वळनावर केएफटी ट्रांसपोर्ट कंपनी कगजनगर यांनी बिना परवानगी वाहन तळ उभारले आहेत .
शेतजमिनीचा बेकायदेशीर वापर, कायद्याचे खुले उल्लंघन आणि महामार्गावरील सुरक्षेचा खेळ करूनही केवळ दंड वसूल करून दोषींना पाठीशी घालणे म्हणजे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करून असे धोकादायक यार्ड तात्काळ हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

*केएफटी लॉजेस्टिक च्या हैदराबाद कार्यालयातील प्रबंधक श्रीशंकर ह्यांचेशी संपर्क केला पन त्यानी मोबाइल फोन उचलला नाही*

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular