Wednesday, June 17, 2026
Google search engine
HomeChandrapurपिपरी-मरोडा रस्त्याची दुर्दशा: ५६% कमिशनच्या भ्रष्टाचारात रस्ता गायब; मुख्य अभियंता वातानुकूलित खोलीत...

पिपरी-मरोडा रस्त्याची दुर्दशा: ५६% कमिशनच्या भ्रष्टाचारात रस्ता गायब; मुख्य अभियंता वातानुकूलित खोलीत सुस्त !

स्थानिक आमदार महोदयाला मतदार राजा ची पडली विसर .. 

चंद्रपूर: ( गड़चांदुर )

सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग १ च्या नियोजनबद्ध दुर्लक्षामुळे आणि भ्रष्टाचाराच्या जाहीर कलीयुगामुळे पिपरी-मरोडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होत असला, तरी प्रत्यक्षात तो निधी रस्त्यावर न मुरता अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात मुरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १८% जीएसटी आणि तब्बल ३८% लाचखोरी असे मिळून ५६% कमिशन अधिकारी, लोकप्रतिनिधि – मंत्रालयात जात असल्याने, केवळ ४४% रकमेतरस्त्याचे थातूरमातूर काम उरकण्यात आले असे वस्तुस्थिति दिसत आहे . याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना बसत असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

१ कोटीच्या निधीतून कामासाठी उरले फक्त ४४ लाख !

जर शासनाने या रस्त्यासाठी *१ कोटी रुपयांचा* निधी मंजूर केला असेल, तर त्यातील तब्बल ५६ लाख रुपये (१८% जीएसटी आणि अधिकाऱ्यांचे कमिशन) आधीच वजा होतात. उरलेल्या अवघ्या **४४ लाख रुपयांमध्ये** कंत्राटदार तरी कशा दर्जाचा रस्ता बनवणार? हा गणिताचा हिशोबच सांगतो की रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले आहे. डांबराचा साधा थरही रस्त्यावर टिकलेला नाही, उलट संपूर्ण रस्ता उखडून मोठमोठे दगड वर आले आहेत, जे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत.

छायाचित्रांमधून उघड झालेले भीषण वास्तव:
या रस्त्यावरून डांबराचा मागमूसही शिल्लक राहिलेला नाही. रस्त्याच्या मधोमध आलेल्या मोठ्या दगड-धोंड्यांमुळे दुचाकी गाड्या घसरून रोज अपघात होत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रस्ता खोल खड्ड्यांनी आणि खडबडीत चढ-उतारांनी भरला आहे. आजारी रुग्णांना किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात नेताना हा रस्ता यमलोकाची वारी घडवून आणत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

मुख्य अभियंता पगारे वातानुकूलित खोलीत सुस्त !

एकीकडे नागरिक रस्त्यावरील धुळीचे आणि खड्ड्यांचे चटके सहन करत नरकयातना भोगत असताना, चंद्रपूर पीडब्लूडी विभाग १ चे *मुख्य अभियंता पगारे* मात्र आपल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसून ऊंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. मैदानावर येऊन रस्त्याची पाहणी करण्याची तसदीही या एसी बाबूला वाटत नाही. शासकीय निधीची ही लूट आणि नागरिकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ मुख्य अभियंत्यांच्या आशीर्वादाशिवाय सुरू आहे का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular