Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeआरोग्यघुग्गुस पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; 'मोठे मासे' नामानिराळे, फक्त छोट्या व्यापाऱ्यांवरच बडगा...

घुग्गुस पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; ‘मोठे मासे’ नामानिराळे, फक्त छोट्या व्यापाऱ्यांवरच बडगा !

(घुग्गुस शहर प्रतिनिधी)

घुग्गुस :

येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) डाहुले व त्यांच्या पथकाने नुकतीच एक लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्याची कारवाई केली. या कारवाईत शाहनवाज शेख नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी या संपूर्ण प्रकरणावरून आता घुग्गुस शहरात संताप आणि उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांची ही कारवाई म्हणजे ‘उंदराला पकडून वाघाला सोडून देण्याचा’ या म्हणी सारखा प्रकार असल्याची टीका नागरिक करत आहेत.

नेमकी कारवाई काय ?

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, API डाहुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून **१ लाख ५ हजार रुपये** किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणात शाहनवाज शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. वरवर पाहता ही कारवाई मोठी वाटत असली, तरी त्यामागील ‘अर्थकारण’ आणि ‘पक्षपातीपणा’ आता चव्हाट्यावर येत आहे.

मोठ्या तंबाखू माफियांना कोणाचे संरक्षण?
घुग्गुस परिसरात सुगंधित तंबाखूचे जाळे पसरलेले आहे. अनेक मोठे व्यापारी दररोज लाखो रुपयांची उलाढाल करतात. मात्र, पोलीस प्रशासन या बड्या माशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

निवडक कारवाई का ?

केवळ लहान व्यवसाय करणाऱ्यांना टार्गेट करून मोठे साठेबाज पोलिसांच्या नजरेतून कसे सुटतात ? शहरात अशी चर्चा आहे की, बड्या तंबाखू व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनाचे छुप्या पद्धतीने ‘अभय’ मिळाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाला (FDA) का डावलले ?
कोणत्याही प्रतिबंधित अन्नपदार्थावर किंवा तंबाखूवर कारवाई करताना अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करणे बंधनकारक असते. मात्र, API डाहुले यांनी कारवाईच्या ठिकाणी FDA च्या अधिकाऱ्यांना बोलावले नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कारवाईच्या वेळी अन्न व औषध प्रशासनाला घटनास्थळी न बोलावण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? पुरावे नष्ट करण्याचा किंवा प्रकरण दाबण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.ना

गरिकांमध्ये संतापाची लाट

पोलीस प्रशासनाच्या या “सोयीस्कर” कारवाईमुळे घुग्गुसकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर सुगंधित तंबाखूवर बंदी आहे, तर ती सर्वांसाठी समान का नाही? छोट्या व्यापाऱ्यांचा बळी देऊन मोठ्या गुन्हेगारांना मोकळे रान देण्याचे काम घुग्गुस पोलीस करत आहेत का?
आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात आणि खऱ्या ‘मोठ्या माशांना’ जेरबंद करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारवाही केली आहे एक लाख पांच हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे . एपीआय : डाहुले घुग्गुस

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular