Tuesday, June 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाने संगीत विद्यालयाला श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान बीड यांची संगीत...

साने संगीत विद्यालयाला श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान बीड यांची संगीत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता.

पुणे ( जिल्हा प्रतिनिधि )

श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज शास्त्रीय गायन, वादन, नृत्य आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय बीड अंतर्गत साने संगीत विद्यालयाला संगीत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत परीक्षा केंद्र म्हणून परिसरातील हे पहिलेच केंद्र आहे. उत्कृष्ट संगीत शिक्षण व योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यालयाला नावलौकिक मिळाला आहे. योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना कसलीही अडचण आली नाही. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इ १० वी परीक्षेत वाढीव गुण मिळण्याची तरतूद केली आहे. मुलांना संगीत शिक्षणाबरोबरच चांगले गुण मिळावेत म्हणून शिवराज साने सरांचे नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतात. विद्यालयामध्ये वर्षेभर फक्त संगीत शिक्षण मिळत नसून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी मदत होते. जगतगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिमान दादा राजळकर उपाध्यक्ष प्रा. श्री बळीराम पवळ सचिव प्रा. जी. एम. पवळ परीक्षा विभाग प्रमुख सौ. गया ताई केदार श्री राजेश केदार यांच्या सहकार्याने साने संगीत विद्यालयाला परीक्षा केंद्र प्राप्त झाले. परीक्षा केंद्र प्राप्त करून देण्यासाठी म्युझिक अकॅडमी डायरेक्टर श्री सुधीर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular