Tuesday, June 2, 2026
Google search engine
Homeक्राइम नामाकोठोडा (बुज) रेती घाटवाद आणि कोरपना पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कोठोडा (बुज) रेती घाटवाद आणि कोरपना पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

तक्रारदार म्हणतो मि प्रेमेंद्र ला ओळखत नाही तर पोलीस रिपोर्ट कशी ?

कोरपना (चंद्रपूर):

तालुक्यातील कोठोडा बुज. येथील पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटावरून सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. घरकुलधारकांसाठी आरक्षित असलेल्या या घाटावर रेती तस्करांनी बनावट आदेशाच्या जोरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणावरून कोठोडा येथे राडा झाला असून, पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय ?
शासकीय नियमानुसार, कोठोडा घाट हा स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना रेती पुरवण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, आर.एस.आर. इन्फोटेक कंपनी (चंद्रपूर) चे प्रोप्रा. राहुल रागीट यांना हा घाट लिलावात मिळाल्याचे भासवून काही रेती तस्कर गावात शिरले. या तस्करांनी नदीकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून तिथे मोठे खड्डे केले.
जेव्हा ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल विचारपूस केली, तेव्हा तस्करांनी उद्धटपणे उत्तरे देत ग्रामस्थांचा अपमान केला. या वादाचे रूपांतर हातापायीमध्ये झाले. नदी पात्रा कड़े जाणारे रस्ते बंद करने – खड्डे करने हे महसुल अधिकारी यांचे काम आहे , रेती तस्करी करणारे स्वता असे खड्डे करने हा गंभीर गुन्हा आहे .

पोलिसांच्या भूमिकेवर संशय

या घटनेनंतर कोरपना पोलीस प्रशासनाने तस्करांच्या दबावाखाली येऊन *प्रेमेंद्र मैदमवार* यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या *गजानन गायकवाड* वय २७ राहणार कोरपना नामक व्यक्तीने तक्रार दिली, तो घटनेच्या वेळी घटनास्थळी हजरच नव्हता. तस्करांनी आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून पोलिसांना हाताशी धरले आणि गजानन गायकवाडचा विशेष ‘अस्त्र’ म्हणून वापर करून मैदमवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, अशी चर्चा परिसरात आहे. दाखल झालेली तक्रार पूर्णपणे खोटी असून, या प्रकरणाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी रविन्द्र मैदमवार यांनी पोलीस अधीक्षक यांचे कड़े केली असल्याची माहिती दिली .

कोठोडा व कोडशी येथील बुद्धजीवी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की , मागील वर्षी २०२५ मध्ये में आरएसआर इंफोटेक या लीलाव धारकांने सीसीटीवी कैमरे न लावता कोडशी (भुज ) व कोडशी २ या दोन घाटावर मोठ्या प्रमाणात उत्खनन केले . घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य आहे, मात्र कोणतीही देखरेख नसताना मोठ्या मशीनद्वारे उत्खनन करून मोठ्या प्रमानात रेती तस्करी करण्यात आली . चालू वर्ष २०२६ मध्ये तशीच पुनरावृत्ति दिसत असून महसुल विभागाने याची गांभीर्यने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे .
१० टक्के रेती ही घरकुल लाभार्थ्यांना मिळालीच पाहिजे. आणि नदी पात्रात पोकलेन किंवा जेसीबीच्या वापराऐवजी मानवी श्रमातून (ट्रॅक्टरद्वारे) उत्खनन व्हावे करिता लवकरच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची (SP) भेट घेणार आहोत अशी माहिती अरुण मैदमवार ग्रीन पर्यावरण संस्थेचे संस्थापक यांनी दिली आहे.

अर्थकारण धेय्यपूर्ति लक्ष गाठन्यासाठी कोरपना पोलिसांनी तस्करांच्या इतक्या आहारी जाऊ नये अश्या घटना थांबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अश्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत ..

आता या प्रकरणी महसूल विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.


——————————–
मला घटनेची काहीच माहिती नाही . मि कोठोड्या ला गेलो तेव्हा वादविवाद मिटला होता . मालकाने मला कोरपना पोलीस स्टेशन ला बोलावले तेव्हा मि गेलो मला रिपोर्ट वर सही कर म्हणाले मि केली . ति कश्याची तक्रार आहे काही माहित नाही . त्या प्रेमेंद्र मैदमवारला मि ओळखत नाही .
गजानन गायकवाड़ तक्रारदार

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular