गोंडपिपरी | राजुरा
गोंडपिपरी तालुक्यातील तोहगांव येथील अवैध रेती तस्करी उघड करण्यासाठी महसुल विभागाने केलेल्या धडक मोहीमेनंतर एक हाय–प्रोफाइल नाव समोर येताच जिल्ह्यात हलकल्लोळ. जप्त वाहनांच्या कागदपत्रांची छाननी करताना स्थानिक आमदारांच्या साळ्याचा उल्लेख पुढे आला आणि प्रकरणाचा राजकीय पारा तुफान चढला. तोहगांव निवासी मोरे यांचे मालकीचे ट्रैक्टर वाहनातून रेती तस्करी होत असताना तहसीलदार गोंड़पिपरी यांच्या नेतृत्वातिल भरारी पथकाने रात्रो गस्ती दरम्यान दोन ट्रैक्टर अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करताना पकड़ले व महसुल अधिनियम १९६६ च्या अन्वय कार्यवाही करत दंडनीय कार्यवाही केली . राज्य शासननाच्या वालू धोरण २०२५ अन्वय पुढील फ़ौझदारी कार्यवाही साथी प्रकरण कोठारी पोलिसांकड़े वर्ग करण्यात आले . याचदरम्यान सर्वाधिक संशय कोठारी पोलिसांच्या भूमिकेवर व्यक्त केला जात आहे.
महसुल विभागाने तस्करीवर आळा घालण्यासाठी तलाठी–मंडळाधिकाऱ्यांसह निर्णायक कारवाई केली. वाहने जप्त झाली, पंचनामा पूर्ण झाला. पण या कारवाईदरम्यान आणि नंतरही कोठारी पोलिसांचा सहभाग नगण्य, हेच जनतेला खटकणारे. नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा थेट आरोप —
“मोरे नावाच्या तस्कराला कोठारी पोलिसांचे संरक्षण; महसुलाची कारवाई वाया घालवण्याचा प्रयत्न!”
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे—
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी अवैध उत्खनन थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या कडक आदेशांचे कोठारी पोलिसांनी उघडपणे उल्लंघन केले.
आदेश स्पष्ट असतानाही पोलिसांकडून ना FIR, ना प्रतिबंधात्मक कारवाई, ना त्वरित तपास—यामुळे पोलिस यंत्रणेची भूमिका सरळ सरळ संशयास्पद ठरत आहे.
जिल्ह्यात चर्चा सुरू —
“मंत्र्यांच्या स्पष्ट निर्देशांची अशी उघडी अवहेलना? कोणाच्या दबावाखाली पोलिस शांत बसले?”
वाहनांतील कागदपत्रांमधून वारंवार आमदारांच्या साळ्याचा उल्लेख समोर येत असल्याने प्रकरण राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील बनले आहे. तस्करी, राजकारण आणि पोलिस संरक्षणाचा त्रिकोण तयार झाल्याने तपासावर काळी छाया पडू लागली आहे.
नागरिकांची मागणी आता अधिक तीव्र—
“तपास निष्पक्ष करा. कोठारी पोलिसांची चौकशी करा. बावनकुले यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.”
राजुरा तालुक्यात चर्चेचा एकच प्रश्न—
सत्य बाहेर येणार की ‘हाय–प्रोफाइल’ नाव वाचवण्यासाठी तपास दाबला जाणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .
*******************
माननीय महसुल मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे कोठारी पोलिसांनी मोठ्या कार्यवाहया केल्या आहेत . तोहगांव येथील मोरे यांचे प्रकरण तहसीलदार गोंड़पिपरी यांनी पोलिस स्टेशन ला काल दिनांक २६ नवंबर पर्यंत तरी पाठवले नाही . परत आज तपासून घेतो , नियमानुसार आणि शासन आदेशा प्रमाणे कार्यवाही करू .योगेश खरसान
सहा.पोलिस निरीक्षक कोठारी



