सावली / चंद्रपुर ( सह संपादक )
सावली शहरातून साखरी घाट मार्गे बिना नंबरच्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असून त्यात कोणत्याही वाहनावर ताडपत्रीचा वापर न केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. ताडपत्री नसल्यामुळे ट्रक धावताना रेतीचे सूक्ष्म कण हवेत उडून रस्त्यालगतच्या नागरिकांच्या डोळ्यांत जात आहेत, तसेच श्वसनसंस्थेवरही गंभीर परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुल्लूरवार यांचेशी संपर्क केला असता या आशा प्रकारच्या वहानावर करवाई करणार असल्याचे सांगितले
आरोग्याला थेट धोका निर्माण करूनही हे ट्रक दिवसाढवळ्या कसल्या संरक्षणात फिरत आहेत, असा सर्रास सवाल उपस्थित होत आहे.
याप्रकरणी महसूल प्रशासन सावली, पोलीस प्रशासन सावली तसेच जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावर डोळेझाक केल्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केले आहेत. नियमबाह्य वाहतूक रोखण्याऐवजी प्रशासन मौन का धरत आहे? असा थेट प्रश्न आता जनतेतून विचारला जातो.
स्थानिकांचा दावा—
• वाहने क्रमांकविना का सोडली जातात?
• ताडपत्री न वापरणाऱ्या ट्रकांवर कारवाई कुठे?
• धूळकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर डोळे-मिळवणी?
नागरिकांनी तत्काळ कारवाईची मागणी केली असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
हवेतील रेतीचे कण वाढत असताना, सावली प्रशासन जागे होणार की अजूनही बिनधास्त रेतीमाफियांचे रस्त्यावर वर्चस्व कायम राहणार?



