गडचांदूर : चंद्रपुर ( विदर्भ सह संपादक )
आगामी नगर परिषद निवडणुकीत तरुण उद्योजक व समाजाभिमुख कार्यकर्ते नीलेश ताजने यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शहरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अभ्यासू-जाणकार आणि लोकांच्या अडचणी समजून घेणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख मजबूत होत आहे.

शहरातील गल्लीबोळात, बाजारपेठेत, कामगार वसाहतीत मतदारांचे एकच म्हणणे ऐकू येत आहे —
“शहराच्या विकासासाठी काम करणारा नेता हवा, आणि नीलेश ताजने त्याला योग्य व्यक्ति अशी चर्चा गड़चांदुर शहरात सुरु आहे , सोबत त्यांचे नगर सेवक पदाचे उमेदवार देखील प्रचारात आघाडी घेत असून नगर सेवक पदाचे उमेदवार शिक्षित व सामाजिक कार्याची जाणीव असनारे असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे ”

कामगार, लघुव्यापारी, तरुण वर्ग, महिला समूह यांच्यात ताजने यांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. समाजकार्यातून तयार झालेला त्यांचा जम बसलेला संपर्क, गरीब व सर्वसामान्यांच्या अडचणींची जाण आणि शहर विकासाबाबतची स्पष्ट भूमिका यामुळे ते या निवडणुकीत बलाढ्य दावेदार ठरत आहेत.
स्थानिक मुद्दे—पाणी, रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, शहरी नियोजन—यांवर ताजने स्पष्ट धोरण मांडत आहेत. यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत विश्वास वाढला आहे.

गडचांदूरच्या नागरिकांमध्ये आता एकच चर्चा…
“बदल हवा असेल तर नीलेश ताजनेच उत्तर!”
ही निवडणूक ताजने यांच्यासाठी निर्णायक ठरणार असून, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झाले आहे.



