सावली (चंद्रपूर) :
सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी 27 नोव्हेंबर रोजी पाथरी परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक करत असलेल्या ठीकरे यांचे ट्रॅक्टर पकडल्याची माहिती स्थानिकांकडून पुढे आली. मात्र सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागल्या असताना ‘कारवाई न करता थेट सोडून दिले’ असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात आर्थिक साठगाठ केल्याची कुजबुज जास्तच जोर धरत असून संपूर्ण व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
लोकसेवकांकडून अशी ढिलाई व आर्थिक सौदेबाजीचे आरोप राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी सेवा – शर्ति निर्मूलन अधिनियमाच्या स्पष्ट उल्लंघनात मोडणारे असल्याचे नागरिकांचे मत आहे. अवैध गौण खनिज तस्करीवर लगाम घालण्याऐवजी प्रशासनाकडूनच ‘पाठबळ’ मिळत असल्याची भावना वाढीस लागली असून जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पाथरी परिसरात अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असूनही महसुल विभागाकडून ठोस कृती न दिसल्याने स्थानिक नागरिकांना प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद वाटत आहे. ट्रॅक्टर पकडूनही प्रकरण ‘सोडवून’ देणे हे जनतेच्या सुरक्षितता व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बेफिकीर व गैरजबाबदार वर्तन असल्याची टीका होत आहे.
नागरिकांचा ठाम सवाल :
“अवैध खनिज तस्करीवर कारवाई करायची, की तस्करांना संरक्षण द्यायचे?”
या प्रकरणात जिल्हाधिकारी व विभागीय पातळीवर उच्चस्तरीय चौकशी करून वास्तविकता उघड करावी, अशी जनतेची जोरदार मागणी आहे.
घटनेची माहिती माननीय महसुल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुले यांना दिली असून आता ह्या प्रकारात काय कार्यवाही होते ह्यकडे जनतेचे लक्ष लागले आहे .
….………………………………….. ……………………..
तुम्हीं मला विचारनारे कौन , लेखी पत्र दया . बघते
प्रांजलि चिरडे तहदिलदार सावली



