Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeविरूर स्टेशनमहसूल विभागाची धडक कारवाई दबंग महिला तलाठी यांनी विरुर स्टेशन परिसरात पकडला...

महसूल विभागाची धडक कारवाई दबंग महिला तलाठी यांनी विरुर स्टेशन परिसरात पकडला हायवा ट्रक

 

राजुरा तालुका प्रतिनिधि प्रविण चिडे, विरुर

विरुर :-
विरुर परिसरातील टेंबुरवाही नाल्यावरून सुरू असलेल्या रेती तस्करीवर महसूल विभागाने नुकतीच धडक कारवाई केली असली, एका महिला दबंग तलाठ्याने पाठलाग करत ही कारवाही केली त्यबद्दल महिला करचाऱ्याचेसर्वत्र कौतुक होत आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, टेंबुरवाही नाल्यावरून रेती वाहतूक करणारा MH 34 BG 8419 क्रमांकाचा हायवा पकडण्यात आला महसूल विभागाच्या पथकाने सकाळी ६ वाजता ही कारवाई केली. हायवा रेतीने भरलेला असून, तो गडचांदूर येथील इसनकर यांचे मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तलाठी शिल्पा बल्लेवार, रामचंद्र बोधे, आणि घनश्याम शेट्टे यांनी पंचनामा करून वाहन तहसील कार्यालयात जमा केले.

मात्र, ग्रामस्थांनी वेगळाच मुद्दा पुढे आणला आहे. त्यांचे म्हणणे आहे की — “ही कारवाई एका दबंग महिला तलाठ्याने केली मग बाकी पुरुष मंडळी कुठे गस्त करित आहेत हा मोठा प्रश्न आहे . महिन्यांपासून या भागात रेती तस्करी सुरू असून, महसूल विभागाचे काही अधिकारीच या रॅकेटमागे आहेत. मंडळ अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक होऊच शकत नाही.”

ग्रामस्थांच्या या आरोपांमुळे राजुरा तालुका महसुल प्रशासनात खळबळ उडाली आहे. काही स्थानिकांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि हायवा यांच्यामार्फत रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात आणि त्यावर कोणीच नियंत्रण ठेवत नाही. उलट रेत तस्कर म्हणतात की ट्रेक्टर असो की ट्रक पकडला म्हणजे तुमच्या तक्रारी मुळे नाही तर त्यांना आम्ही केसेस करण्यासाठी अशी छुपी मदत करतो ह्यवरुन हे सिद्ध होत आहे की , काही अधिकारी आर्थिक साठगांठ करून या तस्करांना संरक्षण देत आहे …

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तळाच्या पातळीवरील कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.

दरम्यान, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. पण ग्रामस्थांचा प्रश्न कायम आहे — “तस्करीवर खरा आळा बसवायचा असेल, तर तिला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना आधी पकडा तरच गौण खनिज तस्करी नियंत्रनात येईल अन्यथा चोरांसाठी वाट मोकळी ती मोकळीच ..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular