चंद्रपूर : ( आयुष ठाकरे वणी तालुका प्रतिनिधि )
गुप्ता पॉवर कंपनी उसगाव प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. १० सप्टेंबरपासून कामावर रुजू करून घेण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. मात्र ते खोटे ठरल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जोरगेवारांच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने प्रकल्पग्रस्त आणि व्यवस्थापन यांच्यात बैठक होऊन तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर रुजू करून घेण्याचे आश्वासन दिले गेले होते. पण आजपर्यंत एकही प्रकल्पग्रस्त कामावर घेतला गेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी याला “फसवणूक” म्हटले आहे.
महिला ठिय्या आंदोलनात पुढे
आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करू, असा इशारा देण्यात आला होता. आज प्रकल्पग्रस्त महिला मोठ्या संख्येने कंपनीच्या गेटसमोर बसल्या असून, आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे. “हाताला काम द्या, नाहीतर गेट बंद करू” अशी घोषणा देत महिला ठिय्या देत आहेत.
प्रकल्पग्रस्तांची मागणी
तातडीने सर्व पात्र प्रकल्पग्रस्तांना कामावर घ्यास्थानिकांना प्राधान्य द्या लिखित करार करून द्याह्या मागण्यासाठी पुनः आंदोलन सुरु झाले हे विशेष..

आमचा प्रकल्प अजुन सुरु झाल नाही तर रोजगार कुठून देऊ .पगार कुठून देणार प्रकल्प पूर्ण पने सुरु झाल की रोजगार देऊ .
अमित पांडे एचआर मैनेजर



