Monday, October 26, 2026
Google search engine
Homeपर्यावरणवणीत प्रदूषणाविरोधात कारवाईचा भडका! ६ युनिट्सची वीज कापल्यानंतर आता एमआईडीसी तिल २...

वणीत प्रदूषणाविरोधात कारवाईचा भडका! ६ युनिट्सची वीज कापल्यानंतर आता एमआईडीसी तिल २ चुना भट्ट्यांवर कारवाईची व स्थलांतराची आक्रमक मागणी

नागरिकांचे माजी मंत्री तथा आमदारांना निवेदन; आगामी विधानसभा हिवाळी अधिवेशनात मुद्दा गाजण्याचे संकेत!

वणी / यवतमाळ: ( वणी तालुका प्रतिनिधि )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) कडक निर्देशानंतर महावितरणने वणी परिसरातील प्रदूषणकारी ६ औद्योगिक व व्यावसायिक युनिट्सचा वीजपुरवठा खंडित करून मोठी धडक कारवाई केली आहे. नोटीसची मुदत संपताच २६ सप्टेंबर रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जे. बी. एकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महावितरणने दाखवलेल्या या ‘सुपरफास्ट’ तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, वणीकरांच्या रोजच्या वीज समस्यांवरही महावितरणने अशीच गतिमानता दाखवावी, तसेच सतत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या बाबत उत्तम सेवेची सांगड घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

वणी एमआयडीसीत असलेल्या २ चुना भट्ट्यांवर कारवाई करून त्या तात्काळ स्थलांतरित करा ! – स्थानिकांचा मागणी

महावितरणच्या या कारवाईनंतर आता वणी परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. वणी एमआयडीसी क्षेत्रातिल अगदी नागरी रहीवाशी वस्तीला लागूनच असलेल्या २ चुना भट्ट्यांमुळे प्रचंड प्रदूषण पसरत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रदूषणकारी २ चुना भट्ट्यांवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी आणि त्या लोकवस्ती व एमआयडीसी भागातून दुसरीकडे स्थलांतरित कराव्यात, अशी जोरदार मागणी वणीतील स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे.  मोठ्या प्रदूषण होत असताना व अनेक तक्रारी देउनही प्रादेशिक अधिकारी एमपीसीबी चंद्रपुर चे फील्ड ऑफिसर स्पॉट विजिट साठी येतात , खातात , पितात आणि निघुन जात असल्याची तक्रार माजी मंत्री महीदयास दिल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे एमपीसीबी चे अधिकारी यांचे विरुद्ध लोकसेवक सेवा शर्ति नुसार कारवाही चे संकेत मिळत आहेत .

माजी मंत्री तथा आमदारांना निवेदन; हिवाळी अधिवेशनात मुद्दा गाजणार!

या संदर्भात आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी माजी मंत्री , माजी विरोधी पक्ष नेते व आमदारांना विशेष निवेदन सादर केले असल्याची माहिती सूत्राकड़ून मिळाली आहे . प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने या २ चुना भट्ट्यांवर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर आगामी विधानसभा हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदार गाजणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नेत्यांनी स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिवेशनात लावून धरण्याचे आश्वासन दिल्याने आता प्रशासनावरील दबाव चांगलाच वाढलैला बघायला मिळणार आहे.

वीज कापण्यात आलेली ६ प्रमुख युनिट्स:

मे. जमजम कॅलसायनर (पूर्वीचे नाव: मे. मारवाह मिनरल्स), गट क्र. ९६, राजूर, ता. वणी.
मे. हितेंद्र लाईम प्रॉडक्ट्स, सर्व्हे क्र. १०६/ए१८, राजूर, ता. वणी.
मे. हिंदुस्थान लाईम वर्कस, गट क्र. ८९, सर्व्हे क्र. २८/१के, राजूर, ता. वणी.
मे. अजय ट्रेडर्स (मार्फत: अजय गुप्ता), चिखलगाव, वणी-यवतमाळ हायवे, ता. वणी.
मे. गणपत ट्रेडर्स, वरोरा-चिखलगाव बायपास, वणी-यवतमाळ रोड, ता. वणी.
मे. नाहिद कोल डेपो, गट क्र. २/६, १७९/१, चिखलगाव रोड, वणी, ता. वणी.
महावितरणच्या अहवालानुसार (पत्र क्र. १६०३), या ६ युनिट्सचा वीजपुरवठा बंद करून तिथे अंधार करण्यात आला आहे. आता वणी एमआयडीसी क्षेत्रातील त्या २ चुना भट्ट्यांवर प्रशासन कधी बडगा उगाराणार, याकडे संपूर्ण वणीकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular