पर्यावरण संरक्षण नियम मोड़नारे प्रमुख उद्योग :फारूक लाईम: २ भट्ट्या
हितेंद्र पुरोहित समूह: स्वस्तिका लाईम, स्वस्तिका मिनरल, स्वस्तिका लाईम वर्क
नरेंद्र बरडिया समूह: बरडिया लाईम वर्क
संजय लाईम वर्क, पूर्वी इंडस्ट्रीज, प्रकाश केमिकल्स, सूर्या लाईम (२ भट्ट्या), त्रिलोक लाईम (१ भट्टी), रुबल लाईम (२ भट्ट्या), जयश्री लाईम, महाराष्ट्र लाईम इंडस्ट्रीज या उद्योगा विरुद्ध श्रमिक मंथन राष्ट्रीय हरित लवादा कड़े गंभीर दखल घेण्यासाठी करणार फॉर्मल लीगल रि-प्रेजेंटेशन
वणी / चंद्रपूर :
( विजय ठाकरे विशेषवृत्त )
वणी-राजूर परिसरात पर्यावरणाचा बळी देऊन आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळून बेकायदेशीर चुना भट्ट्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. एमपीसीबी च्या नियमांना केराची टोपली दाखवत कारवाईपासून वाचण्यासाठी उद्योगपतींनी नवी शक्कल लढवली आहे— “दिवसा भट्ट्या बंद ठेवायच्या आणि रात्रीच्या अंधारात विषारी धूर सोडायचा!” या संपूर्ण प्रकारात एमपीसीबी चंद्रपूर कार्यालयातील काही अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका समोर येत आहे.
पर्यावरण संरक्षण नियमांची घागर उलटी करून त्यावर बसणारे प्रमुख उद्योग फारूक लाईम: २ भट्ट्या – हितेंद्र पुरोहित समूह: स्वस्तिका लाईम, स्वस्तिका मिनरल, स्वस्तिका लाईम वर्क , नरेंद्र बरडिया समूह: बरडिया लाईम वर्क : संजय लाईम वर्क, पूर्वी इंडस्ट्रीज, प्रकाश केमिकल्स, सूर्या लाईम (२ भट्ट्या), त्रिलोक लाईम (१ भट्टी), रुबल लाईम (२ भट्ट्या), जयश्री लाईम, महाराष्ट्र लाईम इंडस्ट्रीज.
“रात्रीस खेळ चाले” –
कारवाई टाळण्याची नवी शक्कल ; दिवसा तपासणी आणि स्थानिक नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागू नये म्हणून भट्ट्या निष्क्रिय दाखवल्या जातात. मात्र रात्री होताच विषारी धूर आणि राख हवेत सोडली जाते. “एमपीसीबी चंद्रपूर आपल्यासोबत आहे, मग भीती कोणाची?” असा बेधडक दावा चुना भट्टी उद्योजक करत असून, यावरून हप्तेखोरी आणि भ्रष्ट साठगाठीचे जाळे उघड होत आहे.
‘ईशान गोल्ड’चा आदर्श विरुद्ध इतरांची दादागिरी
एकीकडे ‘ईशान गोल्ड’ या युनिटने एमपीसीबीच्या क्लोजर नोटीसचा आदर करत सुधारात्मक पावले उचलली आहेत. त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तर दुसरीकडे फारुख लाईम, स्वस्तिका समूह, बरडिया समूह यांसारखे उद्योग कोणतेही नियम न पाळता रात्रीच्या वेळी बेकायदेशीर उत्पादन घेत आहेत.
जनतेचे प्रशासन आणि एमपीसीबी ला थेट प्रश्न रात्रीच्या वेळी धाडी का नाहीत? एमपीसीबी चंद्रपूरचे पथक फक्त दिवसा कागदी कारवाई करण्यासाठीच आहे का? रात्री हवेत पसरणाऱ्या विषारी धुरावर कडक पावले कधी उचलणार ?
साठगाठीची चौकशी कधी? उद्योगपतींना अभय देणाऱ्या एमपीसीबी सायन मुंबई व चंद्रपूरच्या संशयित अधिकाऱ्यांची लाचलुचपत किंवा व्हिजिलन्स मार्फत चौकशी होणार का ? असा प्रश्न राजुर क्षेत्रातील बुद्धिजीवी नागरिक करित आहेत .
महावितरण कार्यकारी अभियंता इंगले व उप अभियंता जयंत एकरेची यांचे झोपेचे सोंग का ?
प्रदूषण मर्यादा ओलांडून बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या भट्ट्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यास महावितरण पांढरकवडा आणि वणी उपविभाग का टाळाटाळ करत आहे ? अर्थात आर्थिक साठगांठ शिवाय हे शक्य नाही हे टेवढेच सत्य असल्याचे दिसत आहे . शेवटी राजुर चुना भट्टी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळ कधी संपनार की अश्या नरक यातना त्यांना सहन करून जीवन जगावे लागणार हे येणारा कालात दिसेलच ..



