गडचांदुर :
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्ष शेतकरी संघटना – गोंडवाना स्वाभिमानी भाजपा गटाच्या वतीने आज गडचांदुर शहरात भव्य आणि उत्साहवर्धक रोड शो काढल्या जाणार अशी माहिती शहर विकास तीसरी आघाडी प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीलेश ताजने ह्यांनी प्रसिद्धि पत्राद्वारे कळविले आहे .
या रोड शो करिता पवित्र रिश्ता आणि माझी तुझी रेशम गांठ फेम लोकप्रिय टीवी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
गड़चांदुर नगरीतील जास्तीत जास्त कार्यकर्ते व नागरिकांनी रोड शो मध्ये सहभागी होण्याची विनंती दीपक चटप , संदीप शेरकी , रामा मोरे , भारत आत्राम , अज़ीम बेग , इमरान पाशा संतोष पटकोटवार इत्यादीनि केली आहे .
शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मोटारकेड, ढोल-ताशांच्या गजरात, युवकांच्या मोठ्या सहभागासह हा रोड शो होणार आहे .
जनतेचा मोठा प्रतिसाद पाहून परिसरात निवडणुकीची हवा अधिकच तापलेली दिसत आहे. विविध भागातून नागरिक स्वयंप्रेरणेने सहभागी होणार अशी माहिती प्राप्त झाली आहे . “जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, विकासाच्या वचनांवर आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी भावना नीलेश ताजने यांनी यावेळी व्यक्त केली.
रोड शोदरम्यान ताजने गटाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या, विकासकामे आणि आगामी योजनांची माहिती देणार आहेत .

महिलांचा, तरुणांचा आणि व्यावसायिकांचा भरघोस सहभाग विशेष ठरनार .
गडचांदुरमध्ये होणाऱ्या आजच्या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे ताजने गटाची निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.



