Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedअ. भा. मातोश्री जिजाऊ साहित्य संमेलना अध्यक्ष प्रख्यात लेखक रवी दलाल यांची...

अ. भा. मातोश्री जिजाऊ साहित्य संमेलना अध्यक्ष प्रख्यात लेखक रवी दलाल यांची निवड

राजुरा :  विदर्भातील प्रख्यात लेखक कवी कादंबरिकार रवी दलाल यांची गोंदिया येथे होणारे तिसरे अखिल भारतीय साहित्य संमेलणाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे अमरावती जिल्ह्यातील मूळ तिवसा गावचे रहिवासी असून सध्या काटोल येथे रहिवासी आहेत आपल्या प्रखर लेखणीच्या साह्याने अनेकांच्या हदयावर राज्य करणारे लेखक यांच्या अनेक कादंबऱ्या, कविता संग्रह, लेख संग्रह, कथा संग्रह प्रकाशित झालेले आहे 300वर्षा पासून विदर्भात अलिखित स्वरूपात असलेले अवधूती भजन यावर रवी दलाल यांनी प्रथम लेखणी उचलली आणि परंपरे नुसार अलिखित अवधूती भजन लिहून काढले अवधूती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह हे अत्यंत गाजलेले पुस्तक पैकी आहे

अवधूती भजन खंडातून प्रकाशित करून अवधूती भजन लेखी स्वरूपात आणणारे रवी दलाल हे पहिले लेखक आहे, नामा बेगळ, उलटी सावली, आठवनितले दिवस, पारध मोवाडचा महापूर, अश्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत, अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष निर्माता दिग्दर्शक राज कुबेर हे नामा कादंबरिवर मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेली बहू चर्चित ‘पारध कादंबरी ‘मान्यवर कांशीरामजी यांच्या हस्ते प्रकाशित झाली असून कादंबरीला राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त आहे. रवी दलाल हे मराठी चित्रपट महा मंडळाचे सभासद आहेत आज पर्यंत मोठ मोठया पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध लेखका पैकी आहेत पाच देशातून मिळणारा आंतर राष्टीय “राक्स “पुरस्कार रवी दलाल यांच्या दंगल कथा संग्राहाला मिळालेला आहे हे विशेष
दिनांक 16/12/2025 रोजी दिल्ली नवीन महाराष्ट्र सदन भवन येथून मानव अधिकार व भ्रस्टाचार निवारण समिती कडून जाहीर झालेला शासनाचा समाज रत्न पुरस्कार नाकारणारे हे एकमेव साहित्यिक असून आपल्या विचारावर ठाम असणारे विद्रोही साहित्यिक आहेत. जे. एन. यु. जवाहर लाल नेहरू इंटर न्याशनल युनिवर शिटी दिल्ली मध्ये “बंगळ “कादंबरीच पुस्तक गॅलरीत समावेश “नामा “कादंबरीचा अभ्यास क्रमासाठी निवड उलटी सावली, वेदनेचा वेद, वेलांटी, खपलेलाची पाय वाट इत्यादी कथा संग्रह प्रकाशित कानू सोनू व महार पारडीचा इतिहास, सावजी चाळ, शंकर पट आठवनितले दिवस आभाळ वन दंगल, पुरण पोळी मास्तर, धाडशी दरोडा, इत्यादी साहित्य कथा संग्रह प्रकाशित झाले आहे रवी दलाल हे नाव फक्त साहित्य क्षेत्रात नाव लौकिक नसून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उतुंग भरारी घेणारे साहित्यिक आहेत वर्धा जिल्यातील चार राधा बाई दलाल नरसिंग कॉलेज संचालक असून अनेक निवड मंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत 1990 पासून बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मा. कांशीरामजी यांचे सहकारी व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आजही कार्यरत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular