Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeChandrapurडब्ल्यूसीएल घुग्गुस खाणीमधून ओव्हरबर्डन चोरीचा पर्दाफाश

डब्ल्यूसीएल घुग्गुस खाणीमधून ओव्हरबर्डन चोरीचा पर्दाफाश

चंद्रपूर ( घुग्गुस प्रतिनिधि )

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस परिसरातील डब्ल्यूसीएल (Western Coalfields Limited) च्या ओपनकास्ट खाणीमधून ओव्हरबर्डन (OB) चोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्र लघु खनिज उत्खनन व वहन अधिनियम, 1957 चे थेट उल्लंघन मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन ट्रक – MH34-BG7088, MH40-1008 आणि MH34-BZ9334 – गेल्या काही दिवसांपासून नकोडा गावाजवळील ओपनकास्ट खाणीमधून ओव्हरबर्डन (खनिजमिश्रित माती) अवैधरित्या बाहेर नेत होते. रात्रीच्या काळोखात पोकलेन मशीनद्वारे हे साहित्य ट्रकमध्ये भरले जाई आणि खाणीबाहेर नेले जाई.

मंगळवारी उशिरा रात्री, ड्युटीवर असलेले एमएसएफ (Mines Security Force) चे रक्षक राशिद शेख व त्यांचे दोन सहकारी यांनी संशयास्पद ट्रकांचा पाठलाग केला. घुग्गुस–चंद्रपूर रोडवरील सप्रा पेट्रोल पंपाजवळ वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न झाला असता चालकांनी विरोध करत धक्काबुक्की व हल्ला केला.

हल्ल्यानंतर आरोपींनी चोरीचे मटेरियल रस्त्यावर टाकून वाहने घेऊन फरार झाले. वाहनांचे रजिस्ट्रेशन तपासणी मध्ये दोन वाहन साकिब शेख व एक वाहन शिवशंकर चे नावे असल्याचे कळते.

चौकशी, कायदा आणि प्रतिक्रिया

घुग्गुस पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असली तरी आरोपी पळून गेल्यानंतरच कारवाई सुरू झाली.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक दिवसांपासून रात्री ट्रक ये-जा करत होते, पण पोलिस व महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, डब्ल्यूसीएल प्रशासन या प्रकरणातील अंतर्गत साखळी तपासत आहे.
डब्ल्यूसीएल परिसरात प्रत्येक वाहनाचे सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण केले जाते, त्यामुळे ही चोरी सुरक्षा यंत्रणेला चुकली कशी, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

🔶 कायदेशीर चौकट : महसूल कायद्याचे उल्लंघन

महाराष्ट्र लघु खनिज अधिनियम, 1957 च्या कलम 48(7) नुसार, शासन परवानगीशिवाय रेत, माती किंवा गौण खनिजाचे उत्खनन किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे.
यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड आणि वाहन जप्तीचा अधिकार महसूल अधिकाऱ्यांना आहे.

मात्र, या घटनेत महसूल विभागाने ना वाहन जप्त केले, ना पंचनामा केला. त्यामुळे प्रशासनातील शिथिलता आणि संभाव्य मिलीभगतीबद्दल शंका अधिक दृढ होत आहे.

❖ स्थानिक नागरिकांचा संताप

स्थानिक नागरिक सुधाकर बांदोरे यांनी सांगितले –“घुग्गुस परिसरात ही पहिली चोरी नाही. मागील काही महिन्यांपासून रात्री डब्ल्यूसीएल च्या खाण क्षेत्रात ट्रक फिरत आहेत, पण प्रशासनाने डोळेझाक केली आहे.मि याआधी नकेदा तहसीलदार चंद्रपुर – डब्ल्यूसीएल ला तक्रार केली आहे परंतु कोणी दक्षता घेतली नाही. हे केवळ दुर्लक्ष नाही, तर संगनमताचा भाग आहे.”

❖ कारवाई आणि जबाबदारीची गरज

ही घटना केवळ आर्थिक नुकसान नव्हे, तर शासन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारी बाब आहे.
आता गरज आहे की पोलिस, महसूल विभाग व डब्ल्यूसीएल प्रशासन या तिन्ही यंत्रणांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात यावी.

“खनिज चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल कायद्याची अंमलबजावणी कडक करणे अत्यावश्यक आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आंतरिक चौकशी सुरू आहे.”
— मनीष पोडे, सब एरिया मॅनेजर, डब्ल्यूसीएल घुग्गुस ओपनकास्ट खाण

डब्लूसीएल प्रशासनाने तक्रार दिली आहे . एफआईआर नोंद झाली आहे आरोपी विरुद्ध लवकर कारवाही करू .श्री सचिन तायवाड़े एपीआई घुग्गुस पोलीस स्टेशन

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular